आयपीएल 2026 दरम्यान इंग्लंडचा कसोटी संघ जाहीर! जोफ्रा आर्चरचा खेळण्यास नकार, 3 नव्या खेळाडूंना संधी
आयपीएल 2026 च्या रणधुमाळीत इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी आपली तयारी सुरू केली आहे. 4 जूनपासून लॉर्ड्सवर होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. संघात 3 अशा खेळाडूंना स्थान मिळाले आहे ज्यांनी अद्याप एकही कसोटी खेळलेली नाही. यामध्ये एमिलियो गे (फलंदाज), सन्नी बेकर (वेगवान गोलंदाज) आणि जेम्स रेव (यष्टीरक्षक फलंदाज) यांचा समावेश आहे. फिरकीपटू रेहान अहमद, वेगवान गोलंदाज मॅथ्यू फिशर आणि ओली रॉबिन्सन यांचे संघात पुनरागमन झाले आहे.
राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा जोफ्रा आर्चर (Jofra Archer) पहिल्या कसोटीसाठी उपलब्ध नसेल. तो सध्या आयपीएलमध्ये खेळणे सुरूच ठेवणार आहे. इंग्लंड क्रिकेटचे व्यवस्थापकीय संचालक रॉब की यांनी सांगितले की, जोफ्रा आर्चर पहिल्या कसोटीसाठी उपलब्ध नाही. तो आयपीएल खेळत राहील. सहा महिन्यांच्या प्रदीर्घ दौऱ्यानंतर त्याला लाल चेंडूच्या क्रिकेटसाठी (Test Cricket) हळूहळू तयार करणे हा यामागचा उद्देश आहे.
पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडचा 15 सदस्यीय संघ:
बेन स्टोक्स (कर्ंधर), रेहान अहमद, गस ऍटकिन्सन, सोनी बेकर, शोएब बशीर, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, बेन डकेट, मॅथ्यू फिशर, एमिलियो गे, जेम्स रेव्ह, ऑली रॉबिन्सन, जो रूट, जेमी स्मिथ, जोश टोंग.
रेहान अहमद (दिल्ली कॅपिटल्स) आणि जॅकब बेथेल (आरसीबी) हे खेळाडू आयपीएलमधील आपल्या संघाची जबाबदारी पूर्ण केल्यानंतर मायदेशी परततील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील ही 3 सामन्यांची मालिका 4 जून ते 25 जून दरम्यान खेळवली जाणार आहे.
Comments are closed.