दिल्लीतील फ्लॅटमध्ये महिला प्राध्यापकाची हत्या

नवी दिल्ली :

दिल्ली विद्यापीठाच्या शिवाजी महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापिका असणाऱ्या देवोस्मिता पॉल (43 वर्षे) यांचा मृतदेह  गुरुवारी पूर्व दिल्लीच्या वसुंधरा एन्क्लेव येथील त्यांच्या फ्लॅटमध्ये मिळाला आहे. फ्लॅटमध्ये त्या एकट्याच राहत होत्या. त्यांचा पती बेंगळूर येथे राहत असून त्याच्यासोबतच्या घटस्फोटाची प्रक्रिया सध्या सुरू होती.  देवोस्मिता यांच्या मृतदेहांवर जखमांच्या खुणा आढळून आल्या आहेत. देवोस्मिता यांचा फोन सकाळपासून बंद होता, यामुळे त्यांच्या बहिणीने तेथे धाव घेतली होती, फ्लॅट बाहेरून बंद आढळल्यावर टाळे तोडण्यात आले आणि आत जाऊन पाहिले असता देवोस्मिता मृत आढळून आल्या. या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस आणि फॉरेन्सिक तज्ञ तेथे पोहोचले. पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवून घेतला आहे. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला असून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.

Comments are closed.