बड्या नेत्यांकडून मुलं, नातेवाईकांच्या उमेदवारीसाठी फिल्डिंग; पुणे, कोल्हापूर, संभाजीनगरपर्यंत
महाराष्ट्र: राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुकांचं बिगुल वाजताच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. प्रत्येक पक्षाने आपल्या नेत्यांना मैदानात उतरून तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या असून, दुसरीकडे इच्छुक उमेदवारांकडून ( Mahanagarpalika Election 2026)तिकीट मिळवण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर महापालिकेची निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवली जाणार असून, उमेदवारी मिळवण्यासाठी नेते मंडळी आपापल्या पक्षाकडे जोरदार ‘फिल्डिंग’ लावत असल्याचं चित्र दिसून येत आहे.( Mahanagarpalika Election 2026)
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेकडून मिळून जवळजवळ दोन हजार इच्छुक उमेदवार मैदानात आहेत. उमेदवारी मिळवण्यासाठी हे इच्छुक उमेदवार आपापल्या पध्दतीने प्रयत्न करत असले, तरी प्रत्यक्षात मात्र तिकीट मिळेल की नाही, याबाबत त्यांच्यात अस्वस्थता आहे. कारण अनेक ठिकाणी पक्षातील बडे नेते, खासदार, आमदार आणि मंत्र्यांकडून एकाहून अधिक जागांसाठी तिकीटांची मागणी होत असल्याची माहिती आहे.( Mahanagarpalika Election 2026)
काही नेते आपल्या मुलासाठी, मुलीसाठी किंवा पत्नीसाठी, तर काहीजण आपल्या भाऊ-बहिणीसाठी उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे नातेवाईकांना तिकीट मिळवून देण्यासाठी पक्षांतर्गत दबाव वाढताना दिसत आहे. या ‘वजनाचा’ पक्षश्रेष्ठींवर नेमका किती प्रभाव पडतो, हे आगामी उमेदवार यादीतून स्पष्ट होईल. मात्र, छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेतील इच्छुक नातेवाईकांची संख्या लक्षणीय असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
शिवसेना शिंदेगट
शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि पालकमंत्री संजय सिरसाट यांनी आपला मुलगा सिद्धांत आणि मुलगी हर्षदासाठी उमेदवारी मागितली आहे.
आमदार प्रदीप जैस्वाल यांनी मुलगा ऋषिकेशसाठी उमेदवारी मागितली आहे.
माजी आमदार किशनचंद तणवाणी यांनी आपला मुलगा आणि भावासाठी उमेदवारी मागितली आहे.
माजी महापौर नंदू घोडेले यांनी स्वतःसाठी आणि पत्नीसाठी उमेदवारी मागितली आहे.
माजी महापौर विकास जैन यांनी स्वतःसाठी आणि पत्नीसाठी उमेदवारी मागितली आहे.
भाजप
खासदार भागवत कराड हर्षवर्धन आणि बहिण उज्वला दहिफळे यांच्यासाठी उमेदवारी मागितली आहे.
आमदार नारायण कुचे यांनी पत्नी शीतलसाठी उमेदवारी मागितली आहे
आमदार संजय केनेकर यांचा मुगला हर्षवर्धन यांच्यासाठी उमेदवारी मागितली आहे.
गुजरातचे मंत्री सी आर पाटील यांची मुलगी धर्मिष्ठा चव्हाण हिने उमेदवारी मागितली आहे.
शिवसेना ठाकरे गट
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी आपला भाऊ राजेंद्र दानवे यांच्यासाठी उमेदवारी मागितली आहे.
चंद्रकांत खैरे यांचा मुलगा ऋषिकेश आणि पुतण्या सचिन यांना उमेदवारी मागतिली आहे .
त्याचबरोबर इम्तियाज जलील यांचा मुलगा बिलाल देखील निवडणुकीसाठी इच्छुक आल्याची चर्चा आहे.
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये कोणत्या नेत्यांची मुलं महापालिका निवडणुकीच्या रिंगणात?
1) खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता
2) शिवसेनेचे (shinde)आमदार राजेश क्षीरसागर यांचे चिरंजीव ऋतुराज क्षीरसागर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार
3) शिवसेनेच्या (shinde) नेत्या माजी आमदार जयश्री जाधव यांचे चिरंजीव सत्यजित जाधव निवडणुकीच्या रिंगणात उतरणार
विधानसभा उपाध्यक्ष आणि अजित पवारांचे विश्वासू अण्णा बनसोडे यांचे पुत्र सिद्धार्थ बनसोडे प्रभाग 9 मध्ये अतिक्रमण करणार
शिंदे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणेंचे पुत्र विश्वजित बारणे आणि पुतणे निलेश बारणे या दोघांना तिकीट दिलं जाणार. विश्वजित आणि निलेश या दोघांना प्रभाग क्रमांक 24 मधून धनुष्यबाण चिन्हावर उभं केलं जाईल.
भाजप आमदार महेश लांडगे यांचे बंधू सचिन लांडगेना पुन्हा एकदा रिंगणात उतरवलं जाण्याची शक्यता आहे. पण कोणत्या प्रभागात निवडणूक लढवायची, हा पत्ता ऐनवेळी उघडला जाणार, अशी चर्चा सुरुये.
भाजप आमदार उमा खापरेंचे पुत्र जयदीप खापरे पहिल्यांदाच निवडणुकीसाठी इच्छुक आहे. प्रभाग क्रमांक 19 मधून इच्छुक आहेत.
भाजप आमदार अमित गोरेखेंच्या आई अनुराधा गोरखे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात असतील. प्रभाग 10 मधून त्यांची उमेदवारी फायनल झाल्याचं बोललं जातंय.
आणखी वाचा
Comments are closed.