FIFA World Cup 2026 – शेवटच्या 7 मिनिटात गेम फिरला; इंग्लंडचे स्वप्नभंग करत अर्जेंटिना अंतिम फेरीत, जेतेपदासाठी स्पेनशी सामना

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कर्णधार लिओनेल मेस्सीच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर गतविजेत्या अर्जेंटिनाने फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. गुरुवारी झालेल्या अत्यंत चुरशीच्या उपांत्य सामन्यात अर्जेंटिनाने इंग्लंडचा 2-1 असा पराभव केला. अँथनी गॉर्डनने गोल करत इंग्लंडला सुरुवातीला आघाडी मिळवून दिली होती. मात्र शेवटच्या सात मिनिटांमध्ये अर्जेंटिनाने जबरदस्त पुनरागमन करत इंग्लंडच्या तोंडून विजयाचा घास हिरावून घेतला. या विजयासह अर्जेंटिनाने सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली असून 1962 नंतर सलग दोनदा विश्वचषक जिंकणारा ब्राझील पाटोपाठ पहिला देश बनण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे.

फर्स्ट हाफमध्ये इंग्लंडच्या संघाने लिओनेल मेस्सीला रोखून धरले होते. डेक्लन राइस, ज्युड बेलिंगहॅम आणि इलियट अँडरसन यांनी मेस्सीला मैदानावर मोकळी जागाच मिळू दिली नाही. या दबावाचा फायदा घेत सेकंड हाफमध्ये 55 व्या मिनिटाला मॉर्गन रॉजर्सच्या पासवर अँथनी गॉर्डनने शानदार गोल करत इंग्लंडला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. या गोलमुळे 1966 नंतर पहिल्यांदाच विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचे इंग्लंडचे स्वप्न साकार होईल असे वाटत होते.

आघाडी मिळाल्यानंतर इंग्लंडने बचावात्मक पवित्रा घेतला. इंग्लंडचा बचाव बघून अर्जेंटिनाने आक्रमणाची धार वाढवली. 39 वर्षांच्या मेस्सीने स्वतः गोल करण्यापेक्षा मिडफिल्डमधून खेळाची सूत्रे हलवली. 85 व्या मिनिटाला मेस्सीच्या एका जादुई पासवर एन्झो फर्नांडिसने गोल करत अर्जेंटिनाला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. या गोलनंतर अवघ्या सात मिनिटांतच मेस्सीच्या आणखी एका उत्कृष्ट असिस्टवर लाऊतॉरो मार्टिनेझने इंग्लंडचा बचाव भेदून दुसरा गोल केला आणि अर्जेंटिनाला 2-1 अशी विजयी आघाडी मिळवून दिली.

अंतिम फेरीत स्पेनशी गाठ

दरम्यान, संपूर्ण स्पर्धेत अर्जेंटिनाने अखेरच्या काही मिनिटांमध्ये अविश्वसनीय खेळ करत विजय खेचून आणला आहे. केव व्हर्डे, इजिप्त आणि स्वित्झर्लंडविरुद्धही अर्जेंटिनाने शेवटच्या 15 मिनिटांमध्ये सामना फिरवला होता. इंग्लंडविरुद्धही अर्जेंटिनाने शेवटच्या 7 मिनिटात दोन गोल करत विजय खेचून आला. आता रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाचा सामना फॉर्मात असलेल्या बलाढ्य स्पेनशी होणार आहे.

FIFA World Cup 2026 – एम्बाप्पेला कसे रोखले, स्पेनच्या प्रशिक्षकांनी उलगडले रहस्य

Comments are closed.