FIFA World Cup 2026 – तीन सामने… शून्य पराभव… तरीही शेवट

<<मंगेश वरवडेकर>>

फिफा वर्ल्ड कप स कप सुरू होण्यापूर्वी इराणचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी बेल्जियम, इजिप्त किंवा न्यूझीलंड नव्हता. त्यांचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी होता… परिस्थिती! एका बाजूला युद्धाच्या ज्वाळा. दुसऱ्या बाजूला आंतरराष्ट्रीय निर्बंध, कुटुंबीयांच्या सुरक्षिततेची चिंता, प्रवासातील अडथळे, मानसिक ताण आणि जगभरातून होणाऱ्या राजकीय चर्चाचा मारा. एकीकडे इतर संघ रणनीती आखत होते आणि दुसरीकडे इराणचे खेळाडू मात्र मनातील वादळ शांत करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या बूटांमध्ये फक्त स्टड नव्हते तर संपूर्ण देशाच्या अपेक्षांचे ओझे होते.

अशा प्रतिकूल वातावरणात वर्ल्ड कपमध्ये उतरलेल्या इराणने पहिल्याच सामन्यात जगाला धक्का दिला. बलाढ्य बेल्जियमविरुद्ध त्यांनी हार मानली नाही. प्रत्येक टॅकल म्हणजे जणू रणांगणावरील प्रतिकार होता. प्रत्येक पासमध्ये आत्मविश्वास होता. सामना बरोबरीत सुटला, पण त्या एका गुणाने इराणने जगाला सांगितले की, आम्ही अजून जिवंत आहोत.

दुसऱ्या सामन्यात बेल्जियमविरुद्ध पुन्हा एकदा त्यांनी हार टाळली. हा सामना फक्त गुणांसाठी नव्हता, तर स्वाभिमानासाठी होता. दोनदा पिछाडीवर पडूनही त्यांनी पुनरागमन केले. जिद्दीची अशी उदाहरणे स्कोअर बोर्डवर दिसत नाहीतः ती इतिहासाच्या पानांवर लिहिली जातात. तिसऱ्या आणि निर्णायक लढतीत इजिप्तविरुद्ध इराण आपल्या विजयाचे खाते उघडू शकला नाही. इजिप्तने चौथ्या मिनिटाला गोल ठोकला तर १४ व्या मिनिटाला इराणने त्याची बरोबरी साधली. तीन सामने… तिन्ही बरोबरीत… एकाही सामन्यात पराभव नाही. तरीही त्यांच्या संघाला साखळीतच बाद व्हावे लागले. खात्यात एकाही विजयाची नोंद नसल्यामुळे इराणचा संघ सर्वोत्तम तिसरा संघ म्हणूनही बाद फेरी गाठू शकला नाही. इतर आठ संघांनी सर्वोत्तम तिसरा संघ म्हणून बाद फेरी गाठली.

इराणच्या खात्यात एकही विजय नसल्याचा ननिया दुगोल त्यांना फटका त्यांना बसला. कारण फुटबॉल कधी कधी काव्यापेक्षा गणितावर चालतो, गुण, गेलफरक आणि स्पर्धेच्या नियमांच्या कठोर आकडेमोडीत इराणचा प्रवास थांबला. त्यांना प्रतिस्पर्ध्याने हरवले नाहीः नियतीने आणि नियमांच्या बेरजेने थांबवले. हा पराभव नव्हताः हा फुटबॉलच्या निर्दयी सौदर्याचा भाग होता.

कधी कधी वर्ल्ड कप हा चेंडूने नाही, तर कॅल्क्युलेटरने जिंकला-हरवला जातो. इराण त्याच गणिताचा बळी ठरला. या स्पर्धेत इराणने गोलांपेक्षा जास्त काही दिलं. त्यांनी जगाला दाखवलं की, परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी जिद्द जिवंत असेल तर मैदानावरचा प्रत्येक मिनिट हा विजयच असतो. त्यांच्या प्रत्येक टॅकलमध्ये मातृभूमीची वेदना होती. प्रत्येक धावण्यात देशासाठी झगडण्याची जिद्द होती.

प्रत्येक गोलनंतरचा आनंद हा तीन गुणपिक्षा मोठा होता. तो संकटांवरच्या विजयाचा आनंद होता. आता स्पर्धेत इराणचं नाव नसेल. पण पराभवाशिवाय बाहेर पडलेला सर्वात जिद्दी संघ म्हणून त्यांची नोंद कायम राहील. काही संघ वर्ल्ड कप जिंकतात… काही संघ वर्ल्ड कपला अर्थ देतात. इराणने भले सामना जिंकला नसेल, पण लाखो फुटबॉलप्रेमींची मनं जिंकली. आणि इतिहासात काही विजय ट्रॉफीपेक्षा मोठे असतात. ते लढले, पण हरले नाहीत. अशा अपराजित संघाला सलाम ठोकण्यासाठी हात आपोआप वर जातो.

Comments are closed.