टीम इंडियावर हेड कोच गौतमचे 'गंभीर' परिणाम! दोन जेतेपद, मात्र तीनमध्ये धक्कादायक क्लीन स्वीप

गेल्या तीन-चार वर्षांपासून टी२० क्रिकेटमधील सर्वात बलाढ्य संघ म्हणून भारत उदयास आला. याचवर्षी भारतीय वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघाने सलग दोनदा टी२० विश्वचषक जिंकण्याची विक्रमी कामगिरी केली, मात्र रविवारी (२८ जून) भारताला धक्कादायक पराभवाचा सामना करावा लादला. हा पराभव अवघ्या ७२ तासांत घडला आणि याची कल्पना कोणीही केली नसेल.

आयर्लंड या एका लहान संघाने भारताचा टी२० मालिकेत पराभव करत इतिहास रचला. त्यांनी केवळ मालिकाच जिंकली नाही तर भारताला २-० असे क्लीन स्वीप केले. त्यांच्या या कामगिरीमुळे गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली गेल्या दोन वर्षांपासून कमी-अधिक प्रमाणात खालावत चाललेल्या भारताच्या कामगिरीलाही धक्का दिला.

या मालिकेतील पहिला सामना २६ जूनला बेलफास्टमध्ये खेळला गेला, ज्यामध्ये आयर्लंडने भारताला ३४ धावांनी पराभूत केले. त्यांचा तो भारताविरुद्ध क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारातील पहिलाच विजय होता. आता दोन दिवसांनंतरच आयर्लंडने त्याची पुनरावृत्ती केली. भारतासाठी हा पराभव हा गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेकडून आणि त्याआधी न्यूझीलंडकडून झालेल्या कसोटी मालिकांमधील व्हाईटवॉशइतकाच वाईट आहे किंवा त्यापेक्षा अधिक वाईट.

गंभीर भारताचा मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून (जुलै २०२४) भारतीय संघाचा खेळ काहीसा बदलला आहे आणि त्याचे काय परिणाम झाले हे आपण पाहिले आहेत. त्याच्या प्रशिक्षणाखाली भारत व्हाईट-बॉल क्रिकेटमध्ये अधिक ताकदवान बनला. त्याने ज्या खेळाडूंना संधी दिली ते निर्णयही योग्य ठरले. भारत त्याच्या मार्गदर्शनाखाली आशिया कप आणि टी२० विश्वचषक विजेता बनला. भारताने गेल्या दोन वर्षात एकही टी२० मालिका गमावली नाही. तसेच संघाने २०२५ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचीही कामगिरी केली होती. एवढ्या उल्लेखनीय कामगिरीमुळेही काही मालिकांमध्ये संघाची झालेली अनपेक्षित वाईट कामगिरी गुरू गंभीरच्या कोचिंगवर नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे.

गंभीरच्या कार्यकाळात भारताची वाईट कामगिरी
गेल्या दोन दशकांत भारताला अकल्पनीय वाटणाऱ्या अपयशांच्या मालिकेला सामोरे जावे लागले आहे. आता त्यामध्ये आयर्लंडविरुद्धच्या मालिकेचा समावेश झाला आहे.

पहिल्यांदाच भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध कोणत्याही प्रकारचा सामना हरला आणि त्यानंतर मालिकाही गमावली. २०२३ च्या आयर्लंड दौऱ्यावरील २-० च्या विजयापासून ते २०२६ टी२० विश्वचषकापर्यंत, सलग १६ मालिका आणि स्पर्धांमध्ये अपराजित राहिल्यानंतर, भारताने प्रथमच टी२० मालिका गमावली आहे. २०१९ नंतर प्रथमच एका संघाने टी२० द्विपक्षीय मालिकेत भारताला क्लीन स्वीप दिला आहे.

२०२४ च्या कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकून, न्यूझीलंडने ३६ वर्षांनंतर भारतात कसोटी सामना जिंकण्यात यश मिळवले. केवळ एकच नाही तर त्यांनी सलग तीन सामने जिंकले आणि भारतात पहिल्यांदा मालिका जिंकण्याची कामगिरी केली. न्यूझीलंडच्या या विजयामुळे भारताला २०११ नंतर प्रथमच मायदेशात कसोटी मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला.

१९९९ नंतर प्रथमच, दक्षिण आफ्रिका २०२५ मध्ये भारतात आले आणि त्यांनीही कसोटी मालिका जिंकली. त्यांनी केवळ मालिकाच जिंकली नाही तर, २-० ने क्लीन स्वीप दिला. त्यानंतर गंभीर गेल्या २५ वर्षांतील पहिला भारतीय प्रशिक्षक ठरला, ज्याच्या कार्यकाळात भारताने मायदेशात दोन कसोटी मालिका गमावल्या.

२७ वर्षांनंतर श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका गमावली.
१० वर्षांनंतर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी गमावली.
१२ वर्षांनंतर घरच्या मैदानावर कसोटी मालिका गमावली.
४५ वर्षांनंतर एका कॅलेंडर वर्षात भारताला एकही वनडे विजय मिळवता आला नाही.

Comments are closed.