भिवंडी टीईटी पेपरफुटी प्रकरणाची व्याप्ती वाढली, बिहार-हरियाणातील तीन आरोपींना अटक; अनेक राज्यां
Bhiwandi TET Paper Leak Case भिवंडी : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटी प्रकरणात भिवंडी (Bhiwandi TET Paper Leak Case) पोलिसांनी मोठी कारवाई करत बिहार आणि हरियाणातील तीन आरोपींना अटक केली आहे. अटक आरोपींमध्ये राजीव श्रीप्रयाग साव (वय 45, पटना – बिहार), आकाश कुमार स्वराज कुमार (वय 30, पटना – बिहार) आणि धीरज बलराज सिंग (वय 28, पानीपत – हरियाणा) यांचा समावेश आहे. आरोपींकडून उद्याच्या टीईटी परीक्षेचे चार प्रश्नपत्रिका संच जप्त करण्यात आले असून, पेपर विक्रीसाठी तब्बल दीड कोटी रुपयांचा व्यवहार होणार असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. (TET Paper Leak Case)
दरम्यानपोलिसांनी आरोपींकडून मोबाईल फोन, डेबिट कार्ड, एटीएम कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, भारत व नेपाळमधील चलन, रोख रक्कम, चेक, प्रेस आयडी कार्ड, निवडणूक ओळखपत्र तसेच लोक जनशक्ती पक्षाचे कार्ड जप्त केला आहे. या प्रकरणातील अटक आरोपींचे साथीदार यांचे नावे समोर आले असून कपिल दहिया (हरियाणा) आणि बिजेंदर कुमार (पटना, बिहार) हे अद्याप फरार असून त्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
Bhiwandi TET Paper Leak Case : विशेष तपास पथक स्थापन, राज्यभरातील नेटवर्कचा शोध
दुसरीकडे या प्रकरणाचे धागेदोरे बिहार, हरियाणा, दिल्ली, आग्रा तसेच इतर राज्यांपर्यंत पोहोचत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या चेकची पडताळणी, आर्थिक व्यवहार, इतर साथीदार आणि संपूर्ण पेपरफुटी रॅकेटचा तपास सुरू आहे. प्रकरणाच्या गांभीर्यामुळे डीसीपी पवन बनसोड यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक व (SIT) स्थापन करण्यात आले असून राज्यभरातील नेटवर्कचा शोध घेतला जात आहे.
पुन्हा टीईटीची परीक्षा कधी होणार? (When will the TET exam be held again?)
टीईटीचा पेपरफुटीनंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्त प्रिया शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पेपर फुटीनंतर ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. लवकर परीक्षा कधी होणार आहे, याचं नियोजन लवकर कळवू, असं प्रिया शिंदे यांनी सांगितले. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. सदर प्रकरणी तिघांवरती गुन्हा दाखल आहे पुढील तपास पोलीस करत आहेत. चौकशी अंतिम निष्पन्न होईल त्याच्यावर कारवाई केली जाईल. अशा प्रकारची परीक्षा घेण्यासाठी तीन आठवड्यांची प्रक्रिया असते, असं प्रिया शिंदे म्हणाल्या. तसेच महाराष्ट्रातील 6 लाख 128 शिक्षकांना पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही. 6 लाख 126 परिक्षार्थी कडून अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. येत्या 2 ते 3 दिवसांनी टीईटी परीक्षेची नवीन तारीख घोषित केली जाईल, अशी माहिती प्रिया शिंदे यांनी दिली. तसेच 37 शहरातील 1028 परिक्षा केंद्रावर पुन्हा नव्याने परिक्षा घेतली जाणार आहे, असंही प्रिया शिंदे यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या
शैक्षणिक कर्ज माहिती:
शैक्षणिक कर्ज EMI ची गणना करा
केतन अग्रवाल यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कँडल मार्च : केतन अग्रवाल यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कँडल मार्च
Comments are closed.