FIFA World Cup 2026 – अनुभवी गोलकीपरच्या चुकीमुळे 2 वेळचा विश्वविजेता उरुग्वे स्पर्धेतून बाहेर, स्पेनच्या विजयामुळे केप वर्डेचं नशीब फळफळलं

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

फिफा वर्ल्डकप 2026 मध्ये स्पेनने उरुग्वेचा 1-0 असा पराभव करत बाद फेरीत धडक मारली आहे. उरुग्वेचा गोलरक्षक फर्नांडो मुस्लेरा याच्या आणखी एका मोठ्या चुकीमुळे दोन वेळच्या विश्वविजेत्या उरुग्वेला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे उरुग्वेचे आव्हान संपुष्टात आले, तर पहिल्यांदाच वर्ल्डकप खेळणाऱ्या केप वर्डेचे नशीब फळफळले. उरुग्वे बाहेर झाल्याने साखळी फेरीत एकही सामना न गमावणाऱ्या केप वर्डेने बाद फेरी गाठली असून आता त्यांचा सामना गतविजेत्या अर्जेंटिनाशी होणार आहे.

दोन वेळचा जगज्जेता राहिलेला उरुग्वेचा संघ ‘ग्रुप एच’ मधील आपल्या तिन्ही सामन्यांमध्ये एकही विजय मिळवू शकला नाही आणि त्यांना रिकाम्या हाताने मायदेशी परतावे लागत आहे. दुसरीकडे, युरोपियन चॅम्पियन स्पेनने 7 गुणांसह आपल्या ग्रुपमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. आता गुरुवारी कॅलिफोर्नियातील इंगलेवुड येथे स्पेनचा सामना ‘ग्रुप जे’ मधील दुसऱ्या क्रमांकाच्या संघाशी (ऑस्ट्रिया किंवा अल्जेरिया) होईल.

सामन्याच्या 42 व्या मिनिटाला स्पेनच्या अ‍ॅलेक्स बाएनाने गोल केला. बाएनाने बॉक्सच्या आतून मारलेला शॉट 40 वर्षीय गोलरक्षक मुस्लेराला नीट अडवता आला नाही. या स्पर्धेतील मुस्लेराची ही तिसरी मोठी चूक होती. या चुकीनंतर निराश झालेल्या मुस्लेराने स्वतःच प्रशिक्षक मार्सेलो बिएल्सा यांना मध्यांतराला आपल्याला बदलण्याची विनंती केली. त्यानंतर दुसऱ्या सत्रात सर्जिओ रोशेट गोलरक्षणासाठी मैदानात उतरला.

फिफा रँकिंगमध्ये 19 व्या स्थानावर असलेला उरुग्वे हा या स्पर्धेतून बाहेर पडलेला आतापर्यंतचा सर्वात उच्च मानांकित संघ आहे. दुसरीकडे शुक्रवारी झालेल्या या ग्रुपमधील दुसऱ्या सामन्यात केप वर्डे आणि सौदी अरेबिया यांच्यातील सामना 0-0 असा अनिर्णित राहिला. त्यामुळे केप वर्डेने 3 गुणांसह ग्रुपमध्ये दुसरे स्थान मिळवले आणि थेट बाद फेरीत प्रवेश केला.

विशेष म्हणजे केव वर्डेचा संघ यंदा अपराजित राहिला आहे. पहिल्या लढतीत केप वर्डेने स्पेनला एकही गोल करू दिला नव्हता. त्यानंतर दुसऱ्या लढतीत उरुग्वेविरुद्ध 2-2 अशी बरोबरी साधली आणि तिसऱ्या लढतीत सौदी अरेबियाला गोलशून्य बरोबरीत रोखले.

Comments are closed.