थर्ड अंपायर स्क्रीनकडे पाहत होते, बेन स्टोक्सने कीवी खेळाडूशी केलं असं काही की, सगळेच चक्रावले;

बेन स्टोक्स ENG विरुद्ध NZ 3री कसोटी: इंग्लंड क्रिकेट संघाचा कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) एका नव्या वादात अडकण्याची शक्यता आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यादरम्यान कीवी फलंदाज मिचेल सँटनर (Mitchell Santner) याच्याशी मैदानावर फिजिकल कॉन्टॅक्ट केल्याप्रकरणी आयसीसी (ICC) त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करू शकते. विशेष म्हणजे, याच सामन्यात स्टोक्सने सँटनरला बाद करून कसोटी क्रिकेटमधील आपले 250 विकेट्स पूर्ण केले, पण विकेटच्या सेलिब्रेशननंतर घडलेल्या एका घटनेने इंग्लंडच्या कर्णधाराच्या अडचणी वाढवल्या आहेत.

वाद नेमका कसा सुरू झाला?

सामन्यादरम्यान बेन स्टोक्सने टाकलेल्या एका शॉर्ट-पिच चेंडूपासून वाचण्याचा प्रयत्न करताना मिचेल सँटनर गडबडला. चेंडू त्याच्या ग्लोव्हजला स्पर्श करून गल्लीत उभ्या असलेल्या जेकब बेथेलच्या हातात गेला. मैदानानावरील पंचांनी (ऑन-फील्ड अंपायर) सँटनरला लगेच बाद दिले. परंतु, सँटनर या निर्णयाशी असहमत होता आणि त्याने रिव्ह्यू (DRS) घेतला. रिप्लेमध्ये स्पष्ट दिसले की चेंडू सँटनरच्या ग्लोव्हजच्या रिस्टबँडच्या वरच्या भागाला लागला होता. आयसीसीच्या नियमांनुसार, रिस्टबँडला बॅटचाच भाग मानले जाते. त्यामुळे थर्ड अंपायरनी देखील ऑन-फील्ड अंपायरचा निर्णय योग्य ठरवत सँटनरला बाद घोषित केले.

स्टोक्सने सँटनरला का लावला हात?

मुख्य विवादाला सुरुवात झाली जेव्हा थर्ड अंपायर या निर्णयाची पडताळणी (Review) करत होते. त्यावेळी मैदानावर सँटनर आणि स्टोक्स यांच्यात संवाद सुरू होता. सँटनरचा असा दावा होता की चेंडू त्याच्या ग्लोव्हजला नाही तर आर्म गार्डला लागला आहे. यावर उत्तर देताना स्टोक्स सँटनरच्या जवळ गेला आणि त्याने सँटनरच्या ग्लोव्हजच्या रिस्टबँडवर बोटाने चेंडू नेमका कुठे लागला होता ती जागा दाखवली. स्टोक्सचा हा अंदाज जरी मैत्रीपूर्ण किंवा गमतीशीर वाटत असला, तरी नियमांच्या चौकटीत तो चुकीचा ठरण्याची शक्यता आहे.

आयसीसीचा (ICC) नियम काय सांगतो?

आयसीसीच्या आचारसंहितेनुसार मैदानावर कोणत्याही खेळाडूशी किंवा पंचांशी कोणत्याही प्रकारचा अयोग्य शारीरिक संपर्क (Physical Contact) करणे पूर्णपणे निषिद्ध आहे. आयसीसीच्या कडक नियमांनुसार, मॅच रेफ्री या प्रकरणाची चौकशी करू शकतात. कारवाई ठरवताना हे पाहिले जाईल की, हा शारीरिक संपर्क जाणूनबुजून केला गेला होता, निष्काळजीपणामुळे झाला होता की तो टाळता येण्याजोगा होता. जरी स्टोक्सने कोणत्याही वाईट भावनेने किंवा रागाच्या भरात सँटनरला स्पर्श केला नसला, तरी त्याने जाणूनबुजून रिस्टबँडला हात लावला होता. आयसीसीच्या कडक नियमांच्या कक्षेत हा प्रकार येत असल्यामुळे इंग्लंडच्या कर्णधारावर दंडात्मक कारवाई किंवा डिमेरिट पॉइंट्स मिळण्याची टांगती तलवार आहे.

हे ही वाचा –

ENG vs NZ 3rd Test : चक्कर आली, मैदानावर धावले डॉक्टर्स अन् LIVE मॅचमध्ये काळजाचा ठोका चुकला! न्यूझीलंडला अचानक बदलावी लागली प्लेइंग-11, नेमकं काय घडलं?

Comments are closed.