राणाजगजितसिंह पाटलांच्या मुलाचे ‘भावी खासदार’ म्हणून झळकले बॅनर्स; धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर

ओमराजे निंबाळकर आणि मल्हार पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील 6 खासदारांनी बंडखोरी करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. मात्र, यानंतर आता धाराशिव जिल्ह्याच्या स्थानिक राजकारणात महायुतीमधील अंतर्गत वाद उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील (Ranajagajitsinha Patil) यांचे सुपुत्र आणि भाजपचे युवा नेते मल्हार पाटील (Malhar Patil) यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिव शहरात लावण्यात आलेल्या ‘भावी खासदार’ अशा आशयाच्या बॅनर्सनी संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले असून, थेट खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांच्या खासदारकीला चॅलेंज देण्यात आले आहे.

Omraje Nimbalkar and Malhar Patil: समर्थकांकडून #MP2029 ची जोरदार बॅनरबाजी

खासदार ओमराजे निंबाळकर यांनी महायुतीमध्ये अधिकृत प्रवेश केल्यानंतर, धाराशिव लोकसभा मतदारसंघात भाजपचे युवा नेते मल्हार पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मल्हार पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या समर्थकांनी संपूर्ण धाराशिव शहरात मोठे होर्डिंग्स आणि बॅनर्स लावले आहेत. विशेष म्हणजे, या बॅनर्सवर #MP2029 असा हॅशटॅग वापरण्यात आला असून, मल्हार पाटील हे आगामी 2029 च्या लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. यामुळे मल्हार पाटील हे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात मैदानात उतरणार का? अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Omraje Nimbalkar and Malhar Patil: महायुतीमधील अंतर्गत संघर्ष तीव्र होणार?

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच ठाकरे सेनेतील 6 खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत (Shivsena) अधिकृत प्रवेश केला होता. यामध्ये धाराशिवचे ओमराजे निंबाळकर यांच्यासह संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय दिना पाटील यांसारख्या बड्या चेहऱ्यांचा समावेश आहे. या सर्व खासदारांनी थेट सत्तेसोबत जाण्याचा म्हणजेच महायुतीत सामील होण्याचा निर्णय घेतला.

ओमराजे निंबाळकर यांच्या महायुतीमधील प्रवेशामुळे आगामी काळात ही जागा शिंदेंच्या शिवसेनेला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, धाराशिवमधील पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी असलेले पाटील आणि निंबाळकर कुटुंब आता एकाच युतीत आल्याने भाजप कार्यकर्ते काहीसे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मल्हार पाटलांच्या समर्थकांनी केलेल्या या बॅनरबाजीमुळे आगामी काळात धाराशिव लोकसभेच्या जागेवरून महायुतीमधील अंतर्गत संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत. आता या बॅनरबाजीवर आणि चॅलेंजवर खासदार ओमराजे निंबाळकर काय प्रतिक्रिया देतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Shrikant Shinde and Omraje Nimbalkar: 11 किलोमीटर पायपीट, 3800 पायऱ्या अन् तिरुपती बालाजीचे दर्शन; श्रीकांत शिंदेंसोबत ओमराजे निंबाळकरांची विशेष वारी, PHOTO

Comments are closed.