ॲरो कंपनीवर FIR करा, रोहित पवारांची मागणी; अजितदादांच्या अपघातात ॲरोचा संबंध काय? कंपनी नेमकं क

बारामती: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अन् राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी सखोल तपास व्हावा या मागणीसाठी आमदार रोहित पवार लढत आहेत.डीजीसीए (DGCA) आणि विमान कंपनी व्हीएसआर यांच्या विरोधात FIR दाखल करण्याच्या मागणीसाठी आमदार रोहित पवार काल मुंबईत मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात दाखल झाले होते, मात्र त्यांची एफआयआर दाखल करून घेतली गेली नाही. त्यावरुन पोलिस ठाण्यामध्ये मोठी वादावादी झाली. रोहित पवारांसह आमदरा अमोल मिटकरी, संदीप क्षीरसागर देखील पोलिस ठाण्यात गेले होते, त्यानंतर आज रोहित पवार युगेंद्र पवार यांनी बारामती पोलिस ठाण्यात देखील  एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेतला नाही.  दोन तास पोलिसांसमोर बसल्यानंतर रोहित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी रोहित पवारांनी सांगितलं की,  एफआयआर कोणा-कोणावरती करण्याची मागणी केली. का त्यांनी ती मागणी केली आहे, याचे देखील तपशील यावेळी रोहित पवारांनी दिले तर त्याचवेळी बोलताना त्यांनी ॲरो (ARROW) कंपनीचा देखील उल्लेख केला आहे. ती कंपनी कशाच्यासंबंधी आहे, तिचं काम काय आहे, याची माहिती देखील रोहित पवारांनी दिली आहे.

Arrow कंपनीची जबाबदारी काय होती?

रोहित पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले, “विमान कोणतं द्यायचं? आणि व्हिजीबिलीटी व्यवस्थित आहे की नाही हे पाहण्याचं काम ॲरो (ARROW) नावाच्या कंपनीचं आहे. या ॲरो (ARROW)  कंपनीचा पवार नावाचा व्यक्ती आहे, त्याने वातावरण ओके आहे हे सांगितलं. त्यानंतर दादा विमानात बसले. त्यामुळे अॅरो नावाच्या कंपनीवर एफआयआर दाखल करण्याची दुसरी मागणी केली आहे. या व्हॅट्सअपवर चॅट झाली. त्या चॅटवर लक्ष ठेवण्यासाठी सरकारी अधिकारी आहेत. त्यांना राज्य सरकार पैसे देते. त्या अधिकाऱ्याने दुर्लक्ष केलं. त्यामुळे दुर्घटना घडली. त्या ग्रुपमध्ये असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा” अशी मागणी रोहित पवार यांनी केली.

“VSR कंपनीकडे लेअर जेटची सात विमानं आहेत. एका विमानातून दादा प्रवास करत होते. ते दुर्घटनाग्रस्त झालं. त्याआधी एक विमान 2023 साली दुर्घटनाग्रस्त झालं. म्हणजे उरली पाच विमानं. डीजीसीएने उरलेल्या पाच विमानांच्या उड्डाणांवर बंदी घातली. याचा अर्थ नॉन कंप्लायन्स होता. मी सर्वांना प्रश्न करतो. जर पाच विमानं बंद आहेत. तर मग अजितदादांना खराब विमान का दिलं? चुकून दिलं की मुद्दाम दिलं? याचा एफआयआर करण्यासाठी आलो होतो” असं आमदार रोहित पवार यांनी सांगितलं. “हा एफआयआर व्हिएसआर कंपनीच्या विरोधात, मालकाच्या विरोधात आहे. कोण अधिकारी आहेत, जे विमान चांगल्या कंडिशनमध्ये आहे हे सांगणारे. अधिकारी कोण होते? त्यांना शोधा हे सांगण्यासाठी एफआयआर करण्यासाठी आलो होतो” असं रोहित पवार म्हणाले.

एफआयआर कोणाच्या विरोधात आहे

हा एफआयआर कोणाच्या विरोधात आहे तर हा एफआयआर व्हीएसआर कंपनीच्या विरोधात आहे. त्यांच्या मालकाच्या विरोधात आहे. त्याचबरोबर विमान उडू शकत नाही, उडू शकत हे बघण्याची जबाबदारी कोणाची आहे, ती डीजीसीएची असते, मग तिथे कोण असे अधिकारी होते, अजित दादाच्या विमानातून प्रवास करत होते, ते विमान चांगलं आहे, चांगल्या कंडीशन मध्ये आहे, हे कोणी सांगितलं, हे कोण अधिकारी आहेत, त्यावर कोणी सह्या केल्या, या अधिकाऱ्यांना शोधा असा दुसरा एफआयआर करण्यासाठी आम्ही आलो होतो. अजित दादांनी कोणत्या विमानाने जावं कोणत्या विमानात बसावं ते विमान उडवायचं की नाही वातावरण बरं आहे की नाही हे बघण्याचं आणि विमान नियोजन करण्याची जबाबदारी ही अॅरो नावाच्या कंपनीवर आहे, त्यांचा जो प्रायव्हेट व्हाट्सअप चॅट आहे, तो मी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून लोकांसमोर आणला, त्यामध्ये एक पवार नावाचा अधिकार आहे, अॅरो नावाच्या कंपनीचा, त्याने सांगितलं वेदर चेक आहे आणि ओके आहे, दादांनी प्रवास केला तरी चालेल आणि ती गोष्ट बघितल्यानंतर दादांच्या पीएनए त्यांना सांगितल्यानंतर दादा सात वाजता गाडीत बसले आणि विमानतळावर पोहोचले मग ही अॅरो नावाची जी कंपनी आहे याच्यावर एफआयआर करा असेही आम्ही सांगितलं आहे, या सर्व गोष्टींवर लक्ष देणारे काही अधिकारी आहेत, ते अधिकारी त्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये होते, त्याच्यात मध्ये होते, तुम्हाला राज्य शासन पगार देत असेल तर एखादा व्हीआयपी ट्रॅव्हल करत असताना तो सुखरूप आहे की नाही ते विमान योग्य आहे की नाही हे बघण्याचा अधिकार त्या अधिकाराचा असताना त्यांनी दुर्लक्ष केलं त्या दुर्लक्षामुळे दादांनी तो प्रवास केला आणि ती दुर्घटना घडली मग त्या ग्रुपमध्ये असतील ते सर्व अधिकारी यांच्यावर एफआयआर करा अशी मागणी मी केली आहे असंही रोहित पवारांनी सांगितलं.

व्हीएसआर कंपनीचं नातं असेल तर त्या मंत्राला पदावर राहण्याचा राहण्याचा अधिकार नाही

यामध्ये मी कोणताही नाव घेतलं नाही, या देशाचे जे केंद्रीय उड्डाण मंत्री आहेत, ज्यांचा राजीनामा मी मागतो आहे, ज्या ज्या पार्टीतून ते येतात आणि व्ही एस आर कंपनीचा डायरेक्ट तिथे कमर्शियल रिलेशनशिप आहे, आर्थिक व्यवहार आहे, आर्थिक व्यवहार असणारा जर एखादा पक्ष असेल, त्याच्या जवळची एखादी कंपनी असेल त्या कंपनीचा आणि व्हीएसआर कंपनीचं नातं असेल तर त्या मंत्राला पदावर राहण्याचा राहण्याचा अधिकार नाही, असं मी बोललो होतो, लोकांची ही इच्छा आहे, पण या एफआयआरमध्ये आम्ही त्या मंत्राचं नाव घेतलंय का? तर नाही घेतलं कारण आम्हाला राजकारण करायचं नाही आणि यामध्ये फक्त पोलिसांना एवढेच सांगितलं एफआयआर व्हावा, आमचा नागरिक म्हणून हक्क आहे, परिवार म्हणून हक्क आहे, तो तुम्ही स्वीकारावा, त्यांना तो स्वीकारावाच लागतो, कारण तो सर्वांना अधिकार आहे, गेले दोन तास आम्ही चर्चा करत आहोत, त्यांनी आम्हाला सांगितलं, करता येणार नाही, कारण अपघात रिपोर्ट हा फाईल झाला आहे, असंही पुढे रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

FIR का घेतला जात नाही ?

काही वर्षापूर्वी अभिनेता सुशांत सिंग राजपूत याचा मृत्यू झाला. त्याने आत्महत्या केली की काय, तो गेला हे सगळं दुर्दैवी होतं. तो मुंबईत रहात होता, पण तो काही महाराष्ट्राचा नव्हता. पण तरीही त्याच्या मृत्यूच्या मुद्यावरून एवढं रान उठवण्यात आलं, चौकशीची मागणी झाली. मग अजित दादा हे तर महाराष्ट्राचे एवढे मोठे नेते आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री होते, मग त्यांच्या सारख्या मोठ्या नेत्याचा मृत्यू झाल्यावरही एफआयआर का घेतला जात नाही? त्यांना न्याय का मिळत नाही ? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला. त्यांच्या मृत्यूला महीना होत आलाय, तरी इतक्या दिवसात काहीच का झालं नाही ? या इन्व्हेस्टिगेशनवर कोणाचा तरी दबाव असल्यामुळेच हा तपास योग्य दिशेन जात नाहीय़े, असा आरोपही रोहित पवार यांनी केला.

आणखी वाचा

Comments are closed.