जुलै महिन्यात गुन्हा दाखल, ऑगस्टमध्ये भाजपचा जिल्हा मंत्री आरोपी मोकाट, पोलिसांचा तपास सुरू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सराफाची 2 कोटी 23 लाख 75 हजार रुपये किमतीची फसवणूक केल्याप्रकरणी जुलै महिन्यात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोघा जणांविरोधात गुन्हा नोंद झाला. गंभीर म्हणजे त्यातील एक आरोपी असणाऱया कल्पेश दरबार याला ऑगस्ट महिन्यात भाजपकडून जिल्हा मंत्री करण्यात आले. भाजपच्या छत्रछायेखाली असलेला आरोपी अद्यापही मोकाट असून पोलीस तपास सुरू आहे.

गोवंडी येथील अंबिका ज्वेलर्सचे मालक कल्पेश दरबार आणि त्यांचा सहकारी मनीष डागलिया या दोघांनी एका व्यवहारात 2 कोटी 23 लाख 75 हजार किमतीचा ऐवज परत न करता आपली फसवणूक केल्याची तक्रार अजित जैन या सराफाने दिली होती. त्यानुसार शिवाजीनगर पोलिसांनी कल्पेश दरबार व मनीष डागलिया यांच्या विरोधात 22 जुलै रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे ऑगस्ट महिन्यात कल्पेश दरबार याला भाजपकडून ईशान्य मुंबई जिल्हा मंत्री म्हणून नेमणूक करण्यात आली. कल्पेश जिल्हा मंत्री म्हणून वावरतोय, पण त्याच्यावर अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. गेल्या महिन्यात 28 तारखेला पोलिसांनी मनीष डागलिया याला या प्रकरणात अटक केली, मात्र कल्पेश दरबार मोकाट आहे.

Comments are closed.