तेलंगणा रुग्णालयात आग; 3 नवजात बालकांचा मृत्यू.

एसीमध्ये विस्फोट झाल्याचा संशय : 27 नवजातांवर सुरु होते उपचार

वृत्तसंस्था, आदिलाबाद

तेलंगणाच्या आदिलाबाल जिल्ह्यातील सरकारी रिम्स रुग्णालयाच्या स्पेशल न्यूबॉर्न केयर युनिटमध्ये सोमवारी रात्री उशिरा आग लागली. या दुर्घटनेत तीन नवजातांचा मृत्यू झाला, तर अन्य दोन नवजातांची प्रकृती गंभीर आहे. या युनिटमध्ये 27 नवजातांवर सुरू होते. आगीच्या घटनेनंतर 25 नवजातांना वेगवेगळ्या खासगी रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले होते.

प्रारंभिक माहितीनुसार एसीत बिघाड होत विस्फोट झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. परंतु अचूक कारण तपास पूर्ण झाल्यावरच समोर येणार आहे. आगीत एका 5 दिवसांच्या नवजाताचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या नवजाताला आगीच्या घटनेनंतर खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते, जेथे मंगळवारी सकाळी त्याचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.  आणखी एका नवजाताचा खासगी रुग्णालयात मंगळवारी दुपारी मृत्यू झाला आहे.

24 नवजातांना उपचारासाठी वेगवेगळ्या खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले असून यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. तर उर्वरित नवजातांच्या आरोग्यावर नजर ठेवली जातेय.

मुख्यमंत्र्यांकडून दु:ख व्यक्त

मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी नवजातांच्या मृत्यूप्रकरणी दु:ख व्यक्त केले. उपचार सुरू असलेल्या नवजातांना प्रभावी आणि अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा पुरविण्याचा निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. तसेच दुर्घटनेच्या चौकशीचा अहवाल सोपविणे आणि रुग्णालयांमध्ये सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यास सांगितले आहे.

दुर्घटनांचे वाढते प्रमाण

भारतात चालू वर्षात रुग्णालयांमध्ये आग लागल्याच्या घटनांमुळे 24 जणांना जीव गमवावा लागला आहे. यात ओडिशाच्या कटकमध्ये 12 रुग्ण, बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये 5 रुग्ण, महाराष्ट्राच्या अमरावतीमध्ये 3 नवजात, तेलंगणाच्या आदिलाबादमध्ये 2 नवजात, उत्तरप्रदेशच्या कानपूरमध्ये 1 नवजात आणि उत्तराखंडच्या देहरादून येथील एक रुग्ण सामील आहे.

Comments are closed.