पाच दिवसावर लग्न, आई अन् भावावर टाकली मिरची पूड टाकत तरुणीचं अपहरण, कारवाईला वेग येताच तरुणीने
भिगवण : दौंडमधील भिगवण येथे एक धक्कादायक घटना घडली होती. आई अन् भावासोबत लग्नासाठी सोन्याची खरेदी करून दुचाकीवरून घरी परतत असताना २१ वर्षीय तरुणीचे भरदिवसा थरारक अपहरण (Bhigwan Kidnapping Case) झाल्याची घटना मंगळवारी (दि. १७) दुपारी चारच्या सुमारास घडली. तरुणीच्या आईला व भावाला मारहाण करीत डोळ्यांत मिरचीपूड टाकून दोन सख्ख्या भावांनी तरुणीला जबरदस्तीने (Bhigwan Kidnapping Case) टेम्पोमध्ये नेले. या प्रकरणी आरोपी जहीर हरून शेख व आयान हरून शेख (रा. शेखवस्ती, स्वामी चिंचोली, ता. दौंड, जि. पुणे) यांच्यावर भिगवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Bhigwan Kidnapping Case)
तर भिगवण पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार,बाजारपेठेतून खरेदी करून परतताना सार्वजनिक विश्रामगृहालगत हॉटेल आनंदच्या पाठीमागील बाजूला आरोपी दुचाकी व अशोक लेलँड टेम्पोसह दबा धरून बसले होते. पीडित कुटुंब दुचाकीने येताच त्यांनी दुचाकी अडवली, आई व भावाला बांबूने मारहाण केली आणि मिरचीपूड टाकून तरुणीचे अपहरण करून टेम्पोमधून पळ काढला.(Bhigwan Kidnapping Case)
घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी भिगवण पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला. ठोस आश्वासन न मिळाल्याने मंगळवारी रात्री १० च्या सुमारास पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी जमाव शांत केला. त्याचबरोबर शांतता राखण्याचं आवाहन पोलिसांनी केलं.
प्रकरणाचा तपास करण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप सिंग गिल, अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड, इंदापूरचे पोलिस निरीक्षक विलास नाळे, बारामतीचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, भिगवणचे साहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद महांगडे यांच्यासह दौंड पोलिस ठाण्याचा स्टाफ कार्यरत आहे.
अवघ्या पाच दिवसांवर लग्न
अपहरण झालेल्या तरुणीचे अवघ्या पाच दिवसांवर लग्न ठरले होते. आरोपी व तरुणी एकाच वस्तीतील असल्याने अपहरणामागील नेमका हेतू अद्याप स्पष्ट झालेला नव्हता. तरूणीचा शोध घेतला जात आहे. बुधवारी (दि. १८) भिगवणची बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली. पोलिस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू न देण्याचे आवाहन केले आहे.
पोलिसांनी कसून तपासाला सुरूवात केल्यानंतर तरुणीचा व्हिडीओ व्हायरल
अपहरण झालेली तरुणी आणि तरुणाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये तिने म्हटलंय की, जबरदस्ती नाही तर माझ्या इच्छेने मी निघून गेले असल्याचे तरुणीने सांगितले आहे. आमचे एकमेकांवर प्रेम असल्याचा खुलासा या तरुणीने व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे. मी जहीर शेख यांच्यासोबत ९ वर्षांपासून प्रेमसंबंधात आहे. कालच्या प्रकरणात माझ्यावर कोणतीही जबरदस्ती केली नाहीये. मी माझ्या इच्छेने आली असल्याचे तरुणी या व्हिडिओमध्ये सांगताना दिसते आहे.
आरोपीच्या अटकेसाठी ग्रामस्थांनी भिगवण येथे भाजपा नेते गोपीचंद पडळकर आणि आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश मोर्चाचा काढला. बसस्थानक परिसरात निषेध व्यक्त करत सभा घेतली. आमदार पडळकर म्हणाले, सगळ्यांनी राजकारण बाजूला ठेवून एकत्र आले पाहिजे. आमदार संग्राम जगताप म्हणाले, कोणत्याही व्यक्ती हितासाठी ही लढाई नसून अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी आपण सतर्क राहिले पाहिजेत.
आणखी वाचा
Comments are closed.