US Firing – व्हर्जिनिया स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये गोळीबार, 5 जण जखमी, एकाची प्रकृती गंभीर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिकेतील व्हर्जिनिया स्टेट युनिव्हर्सिटीत शनिवारी पहाटे गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारात पाच जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. या घटनेनंतर विद्यापीठ परिसर काही काळासाठी बंद ठेवण्यात आला होता. पाचही जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, बॉइसो (Boisseau) स्ट्रीटवरील विद्यापीठाच्या क्वाड अ‍ॅनेक्सेस (Quad Annexes) जवळ हा गोळीबार झाला. स्थानिक वेळेनुसार पहाटे दीडच्या सुमारास पोलीस अधिकारी बॉइसो स्ट्रीटच्या 3300 ब्लॉकमध्ये पोहोचले; तिथे त्यांना VSU च्या निवासस्थानांच्या बाहेर पाच जण गोळीबारात जखमी झालेले आढळले.

हा गोळीबार नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. गोळीबाराचा तपास सुरू असताना विद्यापीठ परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Comments are closed.