Mumbai News – आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये गॅस गळतीमुळे आग, दोन मुलांसह पाच जण जखमी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबईतील पवई येथील आयआयटी कॅम्पसमध्ये गुरुवारी रात्री गॅस सिलेंडर गळतीमुळे आग लागली. या आगीत दोन मुलांसह पाच जण भाजले. कॅम्पसच्या आवारातील एका बांधकाम साईटवरील मजुरांच्या झोपडीत सिलेंडरमधून गॅस गळती झाल्याने ही आग लागली. सर्व जखमींना उपचारासाठी घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, गुरुवारी रात्री 10.24 वाजता गॅस गळतीमुळे आग लागली. यावेळी तिथे खेळत असलेली दोन मुले आगीत भाजली. मुलांच्या किंकाळ्या ऐकून त्यांना वाचवण्यासाठी गेलेले तीन मजूरही या आगीत भाजले. सुरवातीला सर्व पाच जखमींना तातडीने घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी चार जखमींना पुढील उपचारांसाठी कस्तुरबा रुग्णालयात पाठवले.

घटनेची माहिती मिळताच, स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. अंश अहिरवार (12), तहजीब आलम (9), ईश्वर सिंग (37), शिवकुमार सिंग (34) आणि अनिलकुमार यादव (23) अशी जखमींची नावे आहेत.

Comments are closed.