क्रिकेटविश्वात शोककळा! महाराष्ट्रचे दिग्गज क्रिकेटपटू निकोलस साल्दान्हा काळाच्या पडद्याआड

निकोलस साल्दान्ना यांचे निधन झाले न्यूज: माजी क्रिकेटपटू निकोलस साल्दान्हा यांचे 83व्या वर्षी निधन झाले असून, त्यांच्या निधनाने क्रीडा विश्वात हळहळ व्यक्त होत आहे. भारतीय संघासाठी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी न मिळालेली असली, तरी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्यांनी महाराष्ट्रासाठी उत्कृष्ट कामगिरी बजावली होती.

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 2066 धावा

आक्रमक फलंदाजी आणि अचूक गोलंदाजीसाठी ओळखले जाणारे निकोलस साल्दान्हा यांनी महाराष्ट्रासाठी 57 फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये एकूण 2066 धावा केल्या. त्यात एक शतकाचा समावेश असून, त्यांची सर्वोच्च खेळी 142 धावांची होती. त्यांनी 30.83 च्या सरासरीने धावा केल्या आणि 9 वेळा नाबाद राहिले. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करताना त्यांनी 42 झेल टिपले.

करिअरमध्ये 138 विकेट्स

फलंदाजीसोबतच गोलंदाज म्हणूनही त्यांनी चमकदार कामगिरी केली. 57 फर्स्ट क्लास सामन्यांत त्यांनी 138 बळी घेतले. एका डावात 41 धावांत 6 विकेट ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी होती. करिअरमध्ये त्यांनी सहा वेळा पाच विकेट्सची हॅट मिळवली.

नाशिकमध्ये जन्म

निकोलस सलदान्हा यांचा जन्म 23 जून 1942 रोजी महाराष्ट्रातील नाशिक येथे झाला. त्यांनी आपल्या संपूर्ण करिअरमध्ये महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर कोणत्याही राज्यासाठी फर्स्ट क्लास क्रिकेट खेळले नाही. त्यांच्या लेगब्रेक गुगलीमुळे ते विशेष प्रसिद्ध होते आणि त्यांनी अनेकदा महाराष्ट्राला आपल्या खेळीने विजय मिळवून दिला.

ऑलराउंडर म्हणून ख्याती

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने त्यांना राज्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक म्हणून गौरवले आहे. MCAच्या मते, निकोलस हे समर्पित आणि प्रतिभावान क्रिकेटपटू होते, ज्यांनी महाराष्ट्रातील क्रिकेटला महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या प्रभावी ऑलराउंड खेळासाठी आणि खेळभावनेसाठी ते सदैव स्मरणात राहतील.

हे ही वाचा –

VIDEO : रनआउटवरून भर मैदानात राडा! live सामन्यात पाकिस्तानी खेळाडूचा संयम सुटला, ओरडाओरड करत फेकली बॅट अन्…

आणखी वाचा

Comments are closed.