काल रात्री फडणवीसांची भेट घेतली अन् आज सोलापूरच्या माजी आमदारांची भाषाच बदलली, म्हणाले, ‘हर्षवर


सोलापूर: सोलापुरचे पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांपूर्वी मोठा राजकीय धमाका केला आहे. काल (गुरुवारी) रात्री जिल्ह्यातील चार माजी आमदारांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. या हालचालींमुळे जिल्ह्यातील राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, मित्रपक्ष असलेल्या अजित पवार गटालाही गोरे यांनी अप्रत्यक्ष झटका दिल्याचं बोललं जातं. दिवाळीपूर्वी किंवा दिवाळीच्या काळात या नेत्यांचा भाजप प्रवेश सोहळा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून, “जिल्ह्यातील अनेक बडे नेते भाजपमध्ये प्रवेशाच्या वाटेवर आहेत,” असे संकेत त्यांनी दिले आहेत. दरम्यान देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर माजी आमदार दिलीप माने यांनी पक्षातरांचं कारण त्याचबरोबर सर्व गोष्टींवर सविस्तरपणे भाष्य केलं आहे. (Jaykumar Gore)

Dilip Mane: बाजार समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आलो

माजी आमदार दिलीप माने म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत काल भेट झाली. याआधीच जयकुमार गोरे, सचिन कल्याणशेट्टी यांच्यासोबतही आधीच भेट झालेली. परवा आम्हाला निरोप आला होता. राजन पाटील, यशवंत माने, बबनदादा यांच्या मुलांना निरोप होता. पुढच्या निवडणुकाबाबतीत चर्चा झाली. या आधी देखील आमच्या भेटी झालेल्या होत्या. मी वैयक्तिक माझ्या बाबतीत सांगतोय. माझ्याबाबतीत विधानसभा निवडणुकीत काय झालं हे पाहिलं. पण त्यानंतर मला दिल्ली किंवा स्थानिक पातळीवर काहीही विचारले गेले नाही. बाजार समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्री महोदयांच्या संपर्कात आलो. त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक विकास कामे होताना दिसत आहेत. विमानसेवा सुरु झाली, आयटी पार्क देखील होतोय असंही  दिलीप माने यांनी म्हटलंय.

Dilip Mane: माझं सहकार्य राहिलं असं मुख्यमंत्री यांनी आश्वासन दिलं

आम्ही विरोधी पक्षात ही नीट नाही, सत्ताधारीमध्ये देखील नाहीये. निवडणुका तोंडावर आहेत, त्यामुळे आम्ही शांत कसे राहायचं. कार्यकर्ते सातत्याने विचारणा करतायत पुढची भूमिका काय करायचं. त्यामुळेच कार्यकर्त्यांनी सांगितलं तुमची काम होतायत, मुख्यमंत्री सोबत आहेत, जयकुमार गोरे आणि  सचिन कल्याणशेट्टी यांची भूमिका रास्त वाटली. माझ्या मतदारसंघातील माझी काय स्थिती आहे या बाबतीत मी सांगितलं. माझं सहकार्य राहिलं असं मला मुख्यमंत्री यांनी आश्वासन दिलं आहे. आता कार्यकर्त्यांशी चर्चा करू त्यानंतर आमचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीसांना कळवू. बबनदादाचे चिरंजीव हे देखील त्यांचा वडिलांना विचारूनच त्या ठिकाणी आले होते अशी माहिती मानेंनी दिली.

Dilip Mane: हर्षवर्धन सपकाळ यांना दिलीप माने कोण हे माहिती देखील नसावं

त्याचबरोबर मुख्यमंत्री फडणवीसांना आम्ही सांगितलं सुभाष देशमुख हे प्रतिस्पर्धी आहेत. आम्ही कायम त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली आहे. मुख्यमंत्री यांनी सांगितलं की तुम्हीच त्यांची काळजी करू नका. आपल्याला पक्ष वाढवायचे आहे, त्यामुळे तुम्हीच इतरांची चिंता करू नका. इतर जे सहकारी सोबत आलेले होते त्यांच्या देखील अडचणी सारख्याच आहेत. मतदारसंघातील काम होतं नाहीयेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना दिलीप माने कोण हे माहिती देखील नसावं. आज ही काँग्रेसची परिस्थिती आलेली आहे. ज्यांच्यासोबत काँग्रेसमध्ये संबंध होते ते आज तिथं पदावर नाहीयेत, अशी खंत आणि पक्षबदलाचं कारण दिलीप मानेंनी सांगितलं आहे.

आणखी वाचा

Comments are closed.