झारखंडमध्ये चार नक्षलवादी ठार

छत्रा जिल्ह्यातील चकमकीत सुरक्षा दलाला मोठे यश

वृत्तसंस्था/ रांची

झारखंडच्या छत्रा जिह्यातील पिपरवार परिसरात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरुद्ध मोठे यश मिळवले आहे. छत्रामध्ये झालेल्या भीषण चकमकीत चार कुख्यात नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. ठार झालेल्या चार नक्षलवाद्यांमध्ये 15 लाख रुपयांचे बक्षीस असलेला नक्षलवादी सहदेव महातो याचा समावेश होता. छत्रा-हजारीबाग सीमेवर बंदी घातलेल्या सीपीआय (माओवादी) नक्षलवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू करताच सहदेव महातोच्या पथकासोबत भीषण चकमक झाली.

छत्रा जिह्यातील पिपरवारच्या सीमावर्ती भागात आणि हजारीबागच्या केरेडारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही चकमक झाली. चकमकीत झारखंड पोलीस आणि कोब्रा बटालियनचे जवान सहभागी  झाले होते. चकमकीनंतर संपूर्ण परिसर सील करण्यात आला असून सायंकाळी उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती. घटनास्थळावरून चार नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रs व दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.

Comments are closed.