चौथा S-400 स्क्वॉड्रन या आठवड्यात मिळणार आहे

भारताच्या पश्चिम सीमेवर केली जाणार तैनात

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

रशियाकडून निर्मित एस-400 हवाई सुरक्षा क्षेपणास्त्र प्रणालीची चौथी स्क्वाड्रन चालू आठवड्यात भारतात पोहोचणार आहे. ही प्रणाली भारताच्या पश्चिम सीमेवर तैनात केली जाणार असून याच्या माध्यमातून राजस्थान आणि आसपासच्या भागांमध्ये हवाई धोक्यांपासून सुरक्षाक्षमता आणखी मजबूत होणार आहे.

2018 साली भारत आणि रशियादरम्यान 5 एस-400 युनिट्स खरेदीसाठी करार झाला होता. रशिया-युक्रेन युद्ध, देयकसंबंधी अडचणी आणि पुरवठासाखळीतील अडथळ्यांमुळे याच्या पुरवठ्याला विलंब झाला आहे. पाचवे आणि अंतिम स्क्वाड्रन देखील चालू वर्षाच्या अखेरपर्यंत भारताला मिळू शकते.

चालू आठवड्यात उपलब्ध होणाऱ्या एस-400 हवाई सुरक्षा प्रणालीची चौथी स्क्वाड्रन एक जटिल बहुमार्गीय लॉजिस्टिक्स ऑपरेशन्सद्वारे दाखल होणार आहे. यात सागरी जहाजं आणि अवजड सैन्य परिवहन विमाने दोन्हींचा वापर होणार आहे.

एस-400 ची मोठी आणि अवजड उपकरणे म्हणजेच क्षेपणास्त्र लाँचर, ट्रान्सपोर्टर-इरेक्टर-लाँचर (टीईएल) आणि तांत्रिक सहाय्य वाहने रशियातून सुरक्षित कार्गो जहाजाद्वारे भारतीय बंदरांपर्यंत पोहोचविण्यात येतात, तर रडार सिस्टीम, कमांड अँड कंट्रोल मॉड्यूल आणि प्रारंभिक इंटरसेप्टर क्षेपणास्त्रs यासारख्या संवेदनशील उपकरणांना थेट भारतीय वायुदलाच्या वायुतळापर्यंत एअरलिफ्ट करण्यात येते. याकरता बोइंग सी-17 ग्लोबमास्टर यासारख्या सैन्यपरिवहन विमानांचा वापर केला जाणार आहे. भारतात पोहोचल्यावर सर्व उपकरणांना एकीकृत करत परीक्षण केले जाणार आहे.

भारताचे हवाई सुरक्षा कवच

भारताला आतापर्यंत एस-400 च्या तीन स्क्वाड्रन्स प्राप्त झाल्या आहेत, ज्या सक्रीय सेवेत आहेत. एस-400 ही भारताच्या सर्वात आधुनिक दीर्घ पल्ल्याच्या हवाई सुरक्षा क्षेपणास्त्र प्रणालींपैकी एक आहे. रशियाच्या अल्माज-एंटी कंपनीकडून विकसित ही प्रणाली शत्रूची लढाऊ विमाने, क्रूज क्षेपणास्त्रs, बॅलेस्टिक क्षेपणास्त्रs आणि ड्रोन यासारख्या हवाई धोक्यांना ट्रॅक करत त्यांना नष्ट करण्याची क्षमता बाळगून आहे. एस-400 एक मोबाइल सरफेस-टू-एअर मिसाइल सिस्टीम असल्याने ती कमी वेळेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तैनात केली जाऊ शकते. याची रडार प्रणाली जवळपास 600 किलोमीटरपर्यंत हवाई हालचालींचा शोध घेण्यास सक्षम मानण्यात येते. तर ही प्रणाली एकाचवेळी अनेक लक्ष्यांना ट्रॅक अन् इंटरसेप्ट करू शकते.

Comments are closed.