मोठी बातमी! वादळी चर्चेनंतर विधानपरिषदेतही धर्म स्वातंत्र्य विधेयक मंजूर; अनिल परबांचं भाषण

मुंबई : धर्म स्वातंत्र्य करण्यापूर्वी 60 दिवस नोटीस देणे अपेक्षित आहे, हा नियम कशासाठी तर धर्मांतर बळजबरीने तर होतं नाही ना याची खात्री करण्यासाठी हा नियम आहे. विरोधक आम्हाला विचारत आहेत की, आकडेवारी आहे का? तर त्यांना सांगणं आहे की जिथं कायदा नाही तिथं तुम्ही आकडेवारी कुठून आणणार असे म्हणत गृहराज्यमंत्री पंकज भोईर यांनी विधानपरिषदेत धर्म स्वातंत्र्य विधेयकावर उत्तर दिले. विधानसभेनंतर विधानपरिषदेत देखील धर्म स्वातंत्र्य बिल मंजूर करण्यात आले. त्यामुळे, लवकरच महाराष्ट्रात धर्म स्वातंत्र्याचा कायदा होणार असून 7 वर्षांच्या शिक्षेची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे.

मंत्री पंकज भोईर यांनी विधानसभेत धर्म स्वातंत्र्य विधेयक मांडल्यानंतर सभागृहात गेल्या आठवड्यात विधेयकावर चर्चा झाली. त्यानंतर, काल आणि आज गेल्या विधान परिषदेत दोन्ही बाजुने विधेयकावर चर्चा झाली. अखेर, विधानसभेनंतर विधानपरिषदेतही हे विधेयक बहुमताच्या जोरावर मंजूर झाले. त्यानंतर, आजच कामकाज स्थगित करण्यात आलं आहे. उद्या सकाळी 10 वाजता सभागृह सुरू होईल.

पंकज भोईर यांनी बोलताना म्हटले की, धर्मांतर झाल्याची 29 प्रकरणे प्रसाद लाड यांनी समोर आणली. समाजात राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर अन्याय झाला तर सक्षमपणे गुन्हा दाखल करता यावा याची दखल विधेयकात घेतली आहे. बेकायदेशीर धर्मांतरला विरोध करण्यासाठी हा कायदा आहे, असेही भोईर यांनी म्हटलं. विधानपरिषदेत आज या विधेयकावर जोरदार चर्चा झाली. शिवसेना ठाकरे गटानेही विधेयकास पाठिंबा दिला, मात्र अनिल परब यांनी जोरदार भाषण केलं.

मी बिलाला समर्थन करणार आहे मात्र त्यातील काही बाबींचा उलगडा होणे गरजेचे आहे. हे बिल पक्षांतर बिल आहे की धर्मांतर बिल आहे? कारण पक्षांतर्गत बिलामध्ये ज्या बाबी समाविष्ट होत्या, त्या सगळ्या बाबी या बिलामधे समाविष्ट आहेत. फसवू नये, लाडीगोडी दाखवून पळवून नेणे, आमिष दाखवणे, दिशाभूल करणे ह्या सगळ्या गोष्टी नमूद आहेत. महाराष्ट्रामध्ये किती भागात कुठल्या समाजात आणि काय कारण होत धर्मांतराची, त्याची माहिती द्यावी. माझी माहिती आहे गरिबी, गरिबीचा आधार घेऊन समाजात घुसून धर्मांतर केलं जातं. मग या सगळ्या गोष्टी देण्याची जबाबदारी सरकारची आहे, असे म्हणत अनिल परब यांनी धर्म स्वातंत्र्यावर विधानपरिषदेत चर्चा केली.

पाव खाऊन विहिरीत टाकला अन् पाणी प्यायलं

जर सरकार अपयशी ठरत असेल तर अशा लोकांना वाव मिळतो या समाजात घुसायला आणि धर्मांतर करायला. प्रमाण जर वाढलं आहे तर सरकारची कामगिरी कमी झाली आहे का? अशी काय गोष्टी झाल्या की धर्मांतराला स्कोप मिळाला. आधी पाव खाऊन विहिरीत टाकला, ते पाणी प्यायल की झालं धर्मांतर. आता असं काही राहिलेल नाही, असे म्हणत अनिल परब यांनी यापूर्वी घडलेल्या काही धर्मांतराच्या घटनेवर भाष्य केलं. हे एक सामूहिक आणि वैयक्तिक धर्मांतर आहे, सरकारचं हे अपयश आहे. सरकारच्या यंत्रणा तिथे पोहोचू शकत नाही म्हणून धर्मांतर होत आहे, असेही अनिल परब यांनी म्हटलं. दरम्यान, अनिल परब यांनी आमदार प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावरूनही पलटवार केला.

अनिल परब यांचा पलटवार

प्रसाद लाड म्हणाले की ते भाज्या भगव्या करून खाणार आहेत. काल तर आम्हाला रिसेप्शनला हिरव्या भाज्या खायला घातल्या ते कसं काय? आणि ते हेदेखील म्हणले की AI टेक्नॉलॉजी वापरून भाज्या भगव्या करणार आहेत, तर ते कसं काय करणार आहेत? असा सवाल अनिल परब यांनी उपस्थित केला.

हेही वाचा

मोठी बातमी! दहावीचा भूगोलचा पेपर होणार, 50 प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे पडलेला प्रश्न सुटला, पालक अन् विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात

आणखी वाचा

Comments are closed.