रेकी करणाऱ्या जहाल नक्षलवाद्यास अटक; जाळपोळ भुसुरुंग स्फोटासारख्या अनेक कारवायांमध्ये सक्रिय
गडचिरोली : भामरागड तालुक्यातील ताडगाव पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत रेकी करणाऱ्या जहाल नक्षलवाद्यास (Naxal) गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. या एचहाल नक्षलवाद्यावर खुनासह जाळपोळ, भुसूरुंग स्फोटसारखे अनेक कारवायांमध्ये त्याचा सक्रिय सहभाग होता. त्याच्यावर शासनाने दोन लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते. ताडगाव पोलीस (Gadchiroli Police) ठाण्याच्या तिरकामेटा जंगल परिसरामध्ये विशेष अभियान पथकाची दोन पथके नक्षलविरोधी अभियान राबवित असताना जंगल परिसरात त्यांना एक संशयित व्यक्ती फिरत असताना आढळून आल्याने पथकाच्या जवानांनी त्याला ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याची अधिक सखोल चौकशी करण्यासाठी पोलीस उप-मुख्यालय प्राणहिता येथे आणले असता, शंकर भिमा महाका अशी त्याची ओळख पटली.
अधिक चौकशी दरम्यान तो जहाल नक्षलवादी असून घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने तो तिरकामेटा जंगल परिसरात रेकी करण्यासाठी दाखल झाला होता, असे निष्पन्न झाले. सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून पोलिसांच्या या कारवाईला मोठं यश आले आहे?
नक्षलवाद्यांचा नेतृत्व आता तेलंगणामधील पल्लव करणार
दुसरीकडे, नक्षलवाद्यांचा नेतृत्व आता तेलंगणामधील करीमनगर जिल्ह्यातील देवजी उर्फ संजीव उर्फ पल्लव करणार आहे. नंबाला केशव उर्फ बसवराजुच्या एन्काऊंटरनंतर नक्षलवाद्यांचा सर्वोच्च “सरचिटणीस” (जनरल सेक्रेटरी) पद रिक्त होतं.. नक्षलवाद्यांच्या कोअर टीमने सरचिटणीस देवजीची नेमणूक केल्याची माहिती आहे.. तर पोलिसांविरोधातल्या लढ्यात अत्यंत महत्त्वाच्या “दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी” म्हणजे छत्तीसगडचे सात आणि महाराष्ट्रC. गडचिरोली अशा आठ जिल्ह्यातील सशस्त्र ऑपरेशनची जबाबदारी छत्तीसगड मधील भूमिपुत्र हिडमा कडे सोपवण्यात आली आहे.
विशेष म्हणजे नक्षलवाद्यांकडून यासंदर्भात कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.. एबीपी माझाला मिळालेल्या माहितीनुसार छत्तीसगडमध्ये नुकतंच एका नक्षल कमांडरने आत्मसमर्पण केले असून त्याच्या चौकशीत सुरक्षा दल आणि छत्तीसगड पोलिसांना सरचिटणीसपदी देवजी तर दंडकारणणे स्पेशल झोनल कमिटीच्या सचिव पदी हिडमा याची निवड झाल्याची माहिती मिळाली आहे.
भंडाऱ्यात 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लॉजमध्ये बळजबरी, आरोपीला केली पोलिसांनी अटक
अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला विविध प्रलोभन देतं लॉजवर नेलं. तिथं तिच्याशी बळजबरी करण्यात आल्याचा प्रकार भंडारा शहरालगत असलेल्या जमिनी दाभा येथील साई लॉज इथं घडली. याप्रकरणी पीडीतेच्या तक्रारीवरून आंधळगाव पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम 65 (1), 137 (2) पोक्सो अंतर्गत गुन्हा दखल करीत अटक करण्यात आली. प्रकाश सुखदेवे (33) असं आरोपीचं नावं आहे. आरोपी आणि पीडिता हे दोघेही मोहाडी तालुक्यातील आहेत. अल्पवयीन मुलीला लॉजवर नेत असताना लॉज मालकानं ती परवानगी दिली कशी? असा प्रश्न आता उपस्थित होत असून लॉज मालकावरही फौजदारी कारवाई करण्याची मागणी होत आहे.
महत्वाच्या बातम्या:
आणखी वाचा
Comments are closed.