माणुसकीला काळिमा! कोमात असतानाही पैसे काढण्यासाठी बँकेत बोलावलं; वृद्ध महिलेचं दुर्दैवी निधन, ग

Gadchiroli News गडचिरोली : कोमात असतानाही एका वृद्ध महिलेला बँकेत पैसे काढण्यासाठी जावं लागल्याचा धक्कादायक प्रकार गडचिरोली जिल्ह्यातील पोर्ला गावातून (Porla Village) समोर आला होता. या प्रकारानंतर सर्वत्र संताप (Gadchiroli News) व्यक्त केला जात असतानाच आज सकाळी त्या वृद्ध महिलेचा दुर्दैवी निधन झालं आहे. काटली येथील 70 वर्षीय वृद्ध महिला शांताबाई मानकर या मागील काही दिवसापासून कोमात होत्या. त्यांना औषधोपचारासाठी पैशाची गरज असल्याने त्यांच्या खात्यावरील पैसे काढण्यासाठी त्यांची मुलगी आणि जावई यांनी शांताबाई यांच्या अंगठ्याचा ठसा घेऊन येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेत गेले होते.

Gadchiroli News : गडचिरोलीच्या पोर्ला गावात संतापाची लाट, बँक व्यवस्थापकावर कारवाई करण्याची मागणी

मात्र त्यांनी खातेदाराला प्रत्यक्ष हजर करा, त्याशिवाय पैसे मिळणार नाही, अशी भूमिका घेतली. वास्तविक गंभीर आजारी खातेधारकाच्या नातेवाईकाला मेडिकल सर्टिफिकेट मागणे किंवा बँकेचा कर्मचारी घरी पाठवणे गरजेचे होते. मात्र तसे न करता बँकेच्या हेकेखोर धोरणामुळे जावई आणि मुलीला गंभीर आजारी कोमात असलेल्या शांताबाई यांना बँकेत घेऊन जावे लागले. अखेर आज 70 वर्षीय शांताबाई यांचे निधन झाले असून या प्रकारानंतर गावकरी तीव्र संताप व्यक्त करीत असून सबंधित बँक व्यवस्थापकावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Bhandara : एकाच सरणावर पती-पत्नीचा अंत्यविधी; सोरना ग्रामस्थ हळहळले

आपण अनेकदा ‘मरणापर्यंत सोबत राहू’ अशी वचनं ऐकतो, पण भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील सोरना गावात याचीच एक हृदयद्रावक प्रचिती आली आहे. एका वृद्ध दाम्पत्यानं मृत्यूतही एकमेकांची साथ सोडली नाही. पतीच्या निधनाचा धक्का सहन नं झाल्यानं, अवघ्या काही तासांतचं पत्नीनेही जगाचा निरोप घेतला. सोरना येथील लखाराम शहारे (८६) यांचं रात्री ७ वाजता निधन झालं. ज्या पत्नीनं आयुष्यभर सावलीसारखी साथ दिली, त्या ८० वर्षीय जैतुराबाईंना पतीच्या निधनाचा धक्का सहन झाला नाही. पतीच्या निधनानंतर अवघ्या काही तासांतच, म्हणजे पहाटे ३ वाजता जैतुराबाईंचंही निधन झालं. जेव्हा गावच्या स्मशानभूमीत पती-पत्नीची अंत्ययात्रा पोहचली, तेव्हा या दाम्पत्यावर एकाचं सरणावर अंत्यसंस्कार करण्यात आलं. मृत्यूनं ही या जोडीला वेगळं करता आलं नाही, अशीच भावना प्रत्येकांच्या मनात आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Comments are closed.