गॅलेक्सी अपार्टमेंट हल्ला प्रकरण, सलमान खानला ठार मारण्याचा त्यांचा उद्देश होता; बॉडीगार्डची न्यायालयात माहिती
बॉलीवूड अभिनेता सलमान खान याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर गोळीबार करण्यामागे सलमानला ठार मारण्याचा मारेकऱ्यांचा उद्देश होता असा दावा सलमानच्या बॉडीगार्डने न्यायालयात केला.
14 एप्रिल 2024 रोजी मोटार सायकलवरून आलेल्या दोघांनी सलमानच्या निवासस्थानाबाहेर गोळीबार केला. लॉरेन्स बिष्णोई या टोळीने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून या खटल्यावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या खटल्यादरम्यान साक्ष नोंदवताना बॉडीगार्डने माहिती दिली की, हेल्मेट घातलेले दोन जण बाईकवर आले होते आणि इमारतीच्या दिशेने गोळीबार करत होते. हल्लेखोरांनी चार ते पाच वेळा गोळीबार केला. त्यावेळी सलमान पहिल्या मजल्यावरच्या त्याच्या बेडरूममध्ये होता गोळीबार होताच मी इतर सुरक्षा रक्षकांसह तत्काळ मुख्य दरवाजातून बाहेर गेलो त्यावेळी ते हल्लेखोर बाईकवरून सुसाट पळून गेले.
Comments are closed.