गौरी पालवे प्रकरणी व्हॉइस रेकॉर्डिंग संदर्भात धक्कादायक खुलासा; एसआयटीकडून चार्जशीटही दाखल
गौरी गर्जे पालवे मृत्यू प्रकरण: महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरलेल्या डॉ. गौरी पालवे आत्महत्याप्रकरणी (Gauri Garje Palve Death Case) एसआयटीने अखेर न्यायालयात चार्जशीट दाखल केली आहे. या चार्जशीटमध्ये मंत्री पंकजा मुंडे यांचे माजी पीए अनंत गर्जे याला मुख्य आरोपी ठरवण्यात आले आहे. तपासात अनंत गर्जे केवळ पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करत नव्हता, तर तिची सामाजिक बदनामी करण्याची धमकी देत तिला आत्महत्येच्या उंबरठ्यावर नेल्याचा आरोप केला आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी एक काळी डायरी जप्त करण्यात आली असून, त्यामध्ये डॉ. गौरी पालवे (Gauri Palve) यांनी आपल्या आयुष्यातील वेदना, मानसिक तणाव आणि पतीकडून होणाऱ्या छळाची सविस्तर नोंद केली होती. डिसेंबर 2024चा लॅपटॉप जप्त करण्यात आला असून, त्यामध्ये अनेक डिजिटल पुरावे सापडले आहेत.
व्हॉइस रेकॉर्डिंग संदर्भात सर्वात धक्कादायक खुलासा- (Gauri Garje Palve Death Case)
तपासातील सर्वात धक्कादायक खुलासा व्हॉइस रेकॉर्डिंग्स संदर्भात झाला आहे. 22 नोव्हेंबर 2025 रोजी, घटनेच्या दिवशी, अनंत गर्जे याने मुद्दाम स्वतः आणि गौरी यांच्यातील वादाचे रेकॉर्डिंग केले. या ऑडिओ क्लिपमध्ये तो वारंवार गौरीला “तू मर” असे म्हणताना स्पष्ट ऐकू येत असल्याचे चार्जशिटमध्ये म्हटल्याची सूत्रांची माहिती आहे. या रेकॉर्डिंग्स समाजात व नातेवाईकांमध्ये पसरवून गौरीची प्रतिमा खराब करण्याची धमकी अनंत देत होता. या सततच्या मानसिक दबावामुळेच डॉ. गौरी यांनी आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतल्याचे SIT चे म्हणणे आहे.
डॉ. गौरी यांनी प्रणिता अस्वले हिला एकाच वेळी 17 व्हॉइस क्लिप्स पाठवल्या- (Gauri Garje Palve Death Case)
मृत्यूपूर्वी डॉ. गौरी यांनी आपली मैत्रीण डॉ. प्रणिता अस्वले हिला एकाच वेळी 17 व्हॉइस क्लिप्स पाठवल्या होत्या. या क्लिप्समध्ये त्यांनी अनंतकडून होत असलेल्या शारीरिक व मानसिक छळाची संपूर्ण कहाणी सांगितली होती. चार्जशीटमध्ये 22 नोव्हेंबर 2025 च्या दुपारच्या हालचालींचा सविस्तर उल्लेख आहे दुपारी 03:02 वाजता CCTV फुटेजनुसार डॉ. गौरी ‘बे-लीफ सैलून’ मध्ये गेल्या होत्या आणि 03:19 वाजता बाहेर पडल्या. त्या दिवशी सैलूनच्या रजिस्टरमध्ये कोणतीही नोंद नव्हती. (शेवटची नोंद 9 नोव्हेंबरची). त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. मात्र तांत्रिक तपासणी आणि जवळील ‘स्किन स्पेशालिस्ट क्लिनिक’च्या कॅमेऱ्यांमुळे गौरींची उपस्थिती निश्चित झाली.
डॉ. गौरी यांच्या मृत्यूचं कारणही समोर- (Gauri Garje Palve Death Case)
डॉ. गौरी यांच्या पोस्टमार्टम रिपोर्टनुसार, मृत्यू पोस्टमार्टमच्या 12 ते 24 तास आधी झाला होता. मृत्यूचे कारण “Asphyxia following Hanging” (फाशी घेतल्याने झाला) असे नमूद करण्यात आले असून, SIT ने ही घटना अप्राकृतिक मृत्यू म्हणून नोंदवली आहे. या प्रकरणात SIT ने अनंत गर्जे (पती) याच्याविरुद्ध ठोस पुरावे मिळाल्याने त्यालाच मुख्य आरोपी करण्यात आले आहे. शीतल आंधले (नणंद) व अजय गर्जे (देवर) यांच्याविरुद्ध छळाचे पुरेसे पुरावे न आढळल्याने त्यांना चार्जशीटमधून वगळत क्लीनचिट देण्यात आली आहे. अनंत गर्जे याने आपल्या पूर्वीच्या संबंधांची माहिती लपवून विश्वासघात केला, सतत “तू मर” असे शब्द वापरले, तसेच ऑडिओ क्लिप्सच्या माध्यमातून ब्लॅकमेल करून डॉ. गौरी पालवे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचं चार्जशीटमध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.
नेमकं प्रकरण काय? (Gauri Garje Palve Death Case)
भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे याच्या पत्नीने डॉक्टर गौरी पालवे गर्जे (Gauri Garje Palve Death Case) यांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. त्यांनी मुंबईतील वरळी परिसरातील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवलं. आत्महत्येची ही घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी पती अनंत गर्जे याच्यासह दीर आणि नणंदेवर गुन्हा दाखल केला असून अनंत गर्जेला अटकही केली आहे. या प्रकरणी सखोल तपास व्हावा, आमच्या मुलीची आत्महत्या नसून तिची हत्या झाल्याचा दावा पालवे कुटूंबाने केला आहे. तर या प्रकरणाच्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.(Gauri Garje Palve Death Case)
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.