अनंत गर्जेंच्या प्रेमसंबंधांविषयी गौरीच्या कुटुंबीयांना अगोदरच माहिती होतं, कोर्टात वकिलांचा दा
मुंबई: भाजपच्या नेत्या आणि राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक अनंत गर्जे (Anant Garje) याची पत्नी डॉ. गौरी पालवे (Gauri Palave) यांनी आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं आहे. काल त्यांच्यावर मोहोज देवढे येथील त्यांच्या सासरच्या घरासमोर सोमवारी सकाळी तणावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी आरोपी अनंत गर्जे याला अटक करण्याची मागणी नातेवाइकांनी केली आहे. त्यानंतर अनंत गर्जे (Anant Garje) स्वतःहून पोलिसांना शरण आल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर, गौरी गर्जे यांचा अंत्यविधी सासरच्या घरासमोरच करण्याची ठाम भूमिका तिच्या माहेरच्या लोकांनी घेतली. त्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर घरापासून काही अंतरावर गौरी (Gauri Palave) यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सासरे भगवान गर्जे यांनी विधी पार पाडला, या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे. तर या प्रकरणाच्या युक्तीवादावेळी कोर्टात अनंत गर्जेच्या वकिलांनी प्रेमसंबंधाबाबत लग्नापूर्वीच डॉ. गौरी पालवेच्या (Gauri Palave) कुटुंबीयांना सांगण्यात आले होते, असा दावा केला होता.
Anant Garje and Gauri Garje Case: गर्जेच्या प्रेमसंबंधाबाबत लग्नापूर्वीच पालवे कुटुंबीयांना सांगितलेलं
मंत्री पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गर्जेच्या प्रेमसंबंधाबाबत लग्नापूर्वीच डॉ. गौरी पालवेच्या कुटुंबीयांना सांगण्यात आले होते, असा दावा त्याच्या वकिलाने पोलिस कोठडीला विरोध करताना न्यायालयात केला आहे. अशोक पालवे यांनी जबाबात उल्लेख केलेली मूळ कागदपत्रे लातूर येथील रुग्णालयात आहेत. ती ताब्यात घेऊन गौरी पालवेंचे वडील अशोक पालवे यांनी केलेल्या आरोपांची शहानिशा करावी लागेल. अनंत गर्जेसह त्याच्या भावंडांवर देखील आरोप आहेत. त्यांचाही शोध सुरू असून त्यांची चौकशी करणे बाकी असल्याचे सांगत सरकारी वकिलांनी गर्जेच्या कोठडीची मागणी केली.
अनंत गर्जेचे वकील अॅड. मंगेश देशमुख यांनी कोठडीला विरोध करत, दाखल गुन्ह्यातून डॉ. गौरी यांना आरोपीने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे स्पष्ट होत नसल्याचे म्हटले. घटना घडली तेव्हा डॉ. गौरी घरी एकट्याच होत्या. त्यांनी घर आतून बंद केले होते. शिवाय प्रेमसंबंधांबाबत आरोपीने लग्नापूर्वीच डॉ. गौरी यांच्या कुटुंबीयांना कल्पना दिली, असा युक्तिवाद केला. मात्र, न्यायालयाने गर्जेला २७पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
Anant Garje and Gauri Garje Case: फॉरेन्सिक टीमकडून घरात झाडाझडती
अनंत गर्जे वरळीतील बीडीडी चाळीत भाड्याने राहतो. या गुन्ह्याच्या तपासाचा भाग म्हणून महत्त्वाचे धागेदोरे आणि परिस्थितीजन्य पुरावे हस्तगत करण्यासाठी फॉरेन्सिक पथकाने गर्जेच्या घरी धाव घेतली. गौरीने नेमकी कोणत्या परिस्थितीत आत्महत्या केली? याबद्दलचे महत्त्वपूर्ण धागेदोरे मिळवण्याचा प्रयत्न या पथकाकडून सुरू आहे.
आणखी वाचा
Comments are closed.