‘माझ्या आईने सांगितलं अजितदादांचं असं झालंय अन्…’, अजित पवारांच्या आठवणीने गौतमी पाटीलच्या ड
मुंबई : सबसे कातील गौतमी पाटील (Gautami Patil) ही अनेकदा आपल्या डान्समुळे आणि गर्दीमुळे, झालेल्या गोंधळामुळे चर्चेत येते, आज कॉफी विथ कौशिक या कार्यक्रमांमध्ये गौतमी पाटीलने हजेरी लावली, दरम्यान अजित पवारांनी (Ajit Pawar) देखील एकदा गौतमी पाटीलवरती विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ती बैलासमोर नाचू दे नाहीतर कोणासमोर तुला काय फरक पडतो असं म्हणून उत्तर दिलं होतं, तेव्हा एकच हशा पिकला होता, आज कॉफी विथ कौशिकच्या कार्यक्रमांमध्ये अजित पवार यांच्याबाबत गौतमी पाटील भरभरून बोलली. दादांना एकदा महिला कार्यकर्त्यांनी काहीतरी सांगितलं होतं आणि त्यांना राग आला होता, कोणीतरी पक्षातून गौतमी पाटीलची, आणि त्यांचे काही कार्यकर्ते गौतम पाटीलचे शो ठेवत होते, महिला कार्यकर्त्यांनी तक्रार केली, अजितदादांनी असं सांगितलं होतं की, आता कोणीही गौतमी पाटीलचे शो ठेवायचे नाहीत, नंतर काय झालं माहिती नाही, पण अजित पवार आपल्या कार्यकर्त्यांना दम द्यायचे पाटील बाईला बोलवू का? नेमकं काय झालं होतं? या प्रश्नावर उत्तर देताना गौतमी पाटील म्हणाली, मला माहिती नाही. पण मी एक सांगते, दादांच्या बाबतीत नकळत का होईना दादांनी मला सपोर्ट केला, कधी मी दादांसोबत बोलले नाही. आमची कधी भेट ही झाली नाही, पण दादांनी मला अजाणतेपणे सपोर्ट केला. त्यांचं बोलणं असू देत पण मध्ये बैलांसमोर नाचली किंवा तुला काय करायचं, माझ्यासाठी हा दादांचा सपोर्टच आहे असं मी मानते, लोकांनी मला बरेचदा ट्रोल केलं, पण दादांनी त्यावर उत्तर दिलं, दादांनी प्रत्येक कलाकाराला सपोर्ट केला आहे, प्रत्येक कलाकाराला दादांनी जीव लावला आहे, कधी दादांसोबत भेटायची वेळ आली नाही, ही खंत मला आहे, असंही गौतमी पाटीलने म्हटलं आहे.(Gautami Patil)
माझ्या आईने सांगितलं दादांचं असं झालंय अन्…
दादांच्या अपघाताची बातमी ऐकली तेव्हा तुम्ही कुठे होती, या प्रश्नावर उत्तर देताना गौतमी पाटील म्हणाली, मी नुकतीच उठले होते, मी घरीच होते, महाराष्ट्रासाठी ती धक्का देणारी घटना होती, मला माझ्या आईने सांगितलं दादांचं असं झालंय, मी म्हटलं तू वेडी आहेस का असं काय बोलते, वेगळं काहीतरी असेल किंवा फेक न्यूज असू शकते, आत्ता देखील या क्षणाला देखील ते खरं वाटत नाही, ते एकदम शॉकिंग होतं. अख्या महाराष्ट्रासाठी हा मोठा धक्का होता, माझी झोपच गेली ते सगळं ऐकल्यानंतर दादांनी जे महाराष्ट्रासाठी प्रामाणिकपणे काम केलं मला वाटत नाही त्यांच्यासारखं कोणी काम करेल असंही वाटतं नाही, दादा सारखा नेता परत होणे नाही आणि दादांची जागा कोणी घेऊ शकत नाही, आणि ते शक्यही नाही असंही पुढे गौतमी पाटीलने म्हटलं आहे.
गौतमीचा व्हॅलेंटाइन कोण? कधी लग्न करणार?
“माझा अजिबात कुणीही व्हॅलेन्टाईन नाहीये. सध्या माझे कार्यक्रमच सुरू आहेत. व्हॅलेन्टाईन डे असं काही मी सध्या साजरा करत नाहीये. यात मला खरंतर इंटरेस्ट नाही आहे”.
आणखी वाचा
Comments are closed.