पीटीकेएसची सुवर्णभरारी; 13 खेळाडूंची राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

घाटकोपर येथे नुकत्याच पार पडलेल्या तृतीयस्तरीय कलात्मक जिम्नॅस्टिक्स जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या (पीटीकेएस) खेळाडूंनी पदकांची लयलूट केली. या स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या संकुलाच्या 13 जिम्नॅस्ट्सनी राज्य अजिंक्यपद स्पर्धेची पात्रता मिळवली.

चतुर्थ स्तराच्या गटात रिद्धांश कोळंबेकरने सर्वसाधारण विजेतेपदासह सहा सुवर्ण आणि दोन रौप्यपदकांची कमाई करत स्पर्धेत आपली छाप पाडली. कायान दोशीने सुवर्ण व रौप्यपदके पटकावली, तर कबीर शाहने ऑल अराऊंड प्रकारात तृतीय क्रमांकासह रौप्यपदके मिळवली. रघुवीर एस. आर. यानेही राज्यस्तरीय स्पर्धेचे तिकीट निश्चित केले.

पाचव्या स्तरात यंश दुरियाने सातही प्रकारांत सुवर्णपदके जिंकत निर्विवाद वर्चस्व गाजवले. स्तर सहामध्ये पराग मोहितेने चार सुवर्णांसह अन्य पदकांवरही नाव कोरले. वंशराज जंगमनेही सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदकांची कमाई केली.

महिलांचीही जोरदार कामगिरी

स्तर-4 आणि स्तर-5 मध्ये पीटीकेएसच्या महिला संघांनी सुवर्णपदकांसह सांघिक अजिंक्यपदावर मोहोर उमटवली. श्रेया कामत, क्लो गोन्साल्व्हीस, मायरा लोंढे, एलियाना कन्नमकुनील, अवंतिका राजपूत आणि अश्लेषा नेवरकर यांनी विविध प्रकारांत सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदकांची कमाई केली. स्तर-6 मध्ये अभिरामी साळुंकेनेही चार वैयक्तिक पदके जिंकत आपली चमक दाखवली.

Comments are closed.