दक्षिण आफ्रिका विजयासह पुन्हा अव्वल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

दक्षिण आफ्रिकेने पहिल्या कसोटीत बांगलादेशला नऊ विकेट्स राखून पराभूत करत जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या  गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. दक्षिण आफ्रिकेने गुणतालिकेतील न्यूझीलंडचे वर्चस्व संपुष्टात आणले आहे. दक्षिण आफ्रिकेची विजय टक्केवारी आता 75 वर पोहोचली आहे. न्यूझीलंड 72.22 विजयी टक्केवारीसह  दुसऱ्या स्थानावर घसरला आहे.

दक्षिण आफ्रिकेने कसोटीच्या पाचव्या दिवशी बांगलादेशचे केवळ 12 धावांचे लक्ष्य फक्त एक फलंदाज गमावून पूर्ण केले. दुसऱ्या डावात बांगलादेशचा संघ 168 धावांवर सर्वबाद झाला. बांगलादेशने पहिल्या डावात 400 धावा केल्या होत्या, ज्याच्या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने 557 धावा करून 157 धावांची मोठी आघाडी घेतली. मार्केस अकरमनने संघासाठी 157 धावा करत दमदार फलंदाजी केली.

Comments are closed.