मुंबईच्या घाटकोपरमधील गौसिया चाळीवर दरड कोसळली; 6 जणांचा मृत्यू, ड्रोनच्या सहाय्याने बचावकार्य सुरू
मुंबईतील घाटकोपरच्या गौसिया चाळ परिसरात डोंगराचा भाग कोसळ्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेदरम्यान दोन ते तीन घरांवर दरड कोसळली असून अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन, एनडीआरएफ, अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तब्बल 7 तासांपासून बचावकार्य सुरू असून ड्रोनच्या सहाय्याने ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध सुरू आहे. त्यामुळे मृत्तांच्या संख्येत वाढ होण्य़ाची शक्याता बचाव पथकाकडून वर्तवली जात आहे.
नेमकी घटना काय?
घाटकोपरमधील अशोक नगरच्या गौसिया चाळ येथे डोंगर कोसळ्य़ाची मोठी दुर्घटना घडली. पहाटे तीन ते चारच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत 12 ते 13 फुटाचा दगड दोन ते तीन घरांवर कोसळला असून यामध्ये अनेक जण अडकले असल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून अजून काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ड्रोनच्या सहाय्याने हे बचावकार्य अद्यापही सुरूच आहे.
मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि स्थानिक नगरसेवकांनी दुर्घटनास्थळाचा आढावा घेतला असून दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना पालिकेकडून 3 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
Comments are closed.