सोने-चांदीच्या दरात चढ-उतार! दर आणखी वाढण्याची शक्यता; पाहा तुमच्या शहरातील आजचे ताजे दर

आजचा सोन्याचा दर: आज जळगावमधील सोने चांदीच्या दरामध्ये (Gold Rate Today) वाढ झाली आहे. सोने दर काल १५६३०० होते, तर आज १५७५०० रूपयांवर पोहोचले आहे. आज एकूण बाराशे रूपयांची वाढ झाली आहे. तर चांदी दर काल २६८००० होते. आजचे दर २७०००० हजार आहेत. चांदीच्या दरात (Gold Rate Today) दोन हजार रुपयांची वाढ आहे. जीएसटी शिवायचे हे दर आहेत.(Gold Rate Today)

Gold-Silver Price Today: आंतरराष्ट्रीय बाजारात चढ-उतार; सोने, चांदीच्या दरात घसरण

आज (२१ मे) सकाळी सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. सोने तब्बल ५०० रुपयांहून अधिक घसरले असून चांदीही सुमारे २३०० रुपयांनी स्वस्त झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर ५ जून डिलिव्हरीचे सोने मागील सत्रात प्रति १० ग्रॅम १,६०,००६ रुपयांवर बंद झाले होते. आज त्याची सुरुवात १,५९,९०० रुपयांवर झाली. सुरुवातीच्या व्यवहारात सोन्याच्या दरात ५१५ रुपयांची घसरण होत ते १,५९,४९१ रुपयांपर्यंत खाली आले. त्याचप्रमाणे, ३ जुलै डिलिव्हरीची चांदी मागील सत्रात प्रति किलो २,७४,२६५ रुपयांवर बंद झाली होती. आज ती २,७२,२७५ रुपयांवर खुली झाली आणि सुरुवातीच्या व्यवहारात २,२९१ रुपयांनी घसरत २,७१,९७४ रुपयांपर्यंत पोहोचली. आपल्या शहरानुसार सोने-चांदीचे ताजे दर येथे जाणून घेता येतील.(Gold Rate Today)

Gold-Silver Price Today: सोने-चांदीच्या किमतीत मोठे बदल

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोने-चांदीच्या दरांमध्ये मोठी चढ-उतार पाहायला मिळत आहे.

काल कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीत ५ टक्क्यांहून अधिक वाढ झाल्यामुळे आज कमोडिटी बाजारात तेजी आली आहे.

काल अमेरिकन डॉलर आणि बॉण्ड यील्डमधील वाढीमुळे एमसीएक्सवर सोने-चांदीच्या किमतीत घसरण, तर देशभरातील सराफा बाजारात तेजी पाहायला मिळत होती.

‘गुडरिटर्न्स’नुसार, आज दिल्लीच्या सराफा बाजारात २२ कॅरेट सोन्याचा भाव १,४५,३१० रुपये प्रति १० ग्रॅम आणि एक किलो चांदीचा भाव २,७९,९०० रुपये प्रति किलोग्राम झाला आहे.

‘इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन’नुसार (IBJA), २० मे रोजी शुद्ध सोन्याची किंमत १५,८५६ रुपये, २२ कॅरेट सोन्याचा भाव १५,४७५ रुपये आणि १८ कॅरेटचा भाव १२,८४३ रुपये झाला होता.

Gold-Silver Price Today: आज देशातील प्रमुख शहरांमध्ये चांदीचा भाव

सोन्याप्रमाणेच चांदीच्या किमतीतही सध्या मोठी चढ-उतार पाहायला मिळत आहे. ‘गुडरिटर्न्स’नुसार दिल्ली, मुंबई, कोलकाता, बेंगळुरू आणि हैदराबादमध्ये १ किलो चांदीचा भाव २,७९,९०० रुपये झाला आहे. तर चेन्नईमध्ये हा भाव २,८४,९०० रुपये प्रति किलोग्रामवर पोहोचला आहे.

Gold-Silver Price Today: शहरानुसार आजचे सोने आणि चांदीचे दर

नवी दिल्ली
२२ कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम) – ₹१,४६,१५०
२४ कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम) – ₹१,५३,४६०
चांदीचा भाव (प्रति किलो) – ₹२,८५,०००

मुंबई
२२ कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम) – ₹१,४६,१५०
२४ कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम) -₹१,५३,४६०
चांदीचा भाव (प्रति किलो) – ₹२,८५,०००

कोलकाता
२२ कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम) – ₹१,४१,५०
२४ कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम) – ₹१,५८,३५०
चांदीचा भाव (प्रति किलो) – ₹२,७९,९००

चेन्नई
२२ कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम) – ₹१,४७,४९०
२४ कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम) – ₹१,६०,५२०
चांदीचा भाव (प्रति किलो) – ₹२,७३,६५०

बेंगळुरू
२२ कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम) – ₹१,४५,१६०
२४ कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम) – ₹१,५८,३६०
चांदीचा भाव (प्रति किलो) – ₹२,७९,९००

अहमदाबाद
२२ कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम) – ₹१,४५,२१०
२४ कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम) – ₹१,५८,४१०
चांदीचा भाव (प्रति किलो) – ₹२,८०,०००

लखनौ
२२ कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम) – ₹१,४६,१५०
२४ कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम) – ₹१,५३,४६०
चांदीचा भाव (प्रति किलो) – ₹२,८५,०००

पुणे
२२ कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम) – ₹१,४६,६००
२४ कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम) – ₹१,५९,९९०
चांदीचा भाव (प्रति किलो) – ₹२,८५,०००

केरळ
२२ कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम) – ₹१,४५,१६०
२४ कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम) – ₹१,५८,३६०
चांदीचा भाव (प्रति किलो) – ₹२,७४,०९०

Comments are closed.