अबब! सोन्याच्या किंमतीने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले, पार आवाक्याबाहेर गेले, 10 ग्रॅम सोन्याचा आजच


आज सोन्याची किंमत: अमेरिका चीनमधील व्यापार तणाव, जागतिक अनिश्चिततेमुळे सोमवारी भारतातील सोन्याच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली. ऐन सणासुदीच्या आणि लग्नसराईच्या काळात सोन्याच्या किमतींत रेकॉर्ड ब्रेक वाढ झाल्याने ग्राहकांच्या खिशाला झळ बसत आहे .सोन्यासह चांदीचे ही भाव ग्राहकांच्या अवाक्याबाहेर गेले आहेत . इंडियन बुलियन असोसिएशननुसार, 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव ( 14 ऑक्टोबर ) 1 लाख 26 हजार 590 रुपये प्रति 10 ग्रॅम नोंदवला जात आहे .तर किलोमागे चांदीचा दर एक लाख 61 हजार 670 रुपयांवर पोहोचला आहे . (Gold latest news)

दरम्यान, 24 तासांपूर्वी (13 ऑक्टोबर ) सोन्याचा भाव 1 लाख 24 हजार 520 रुपये होता .आज तो 1 लाख 26 हजार 590 झाला आहे . म्हणजेच 24 तासात सोन्याच्या भावात झालेली वाढ ही 2070 आहे . काल दिवसभरात एक किलो मागे चांदीचा दर 1 लाख 54 हजार 600 रुपये होता .तो आज एक लाख 61 हजार 670 रुपये झाला आहे . म्हणजे गेल्या 24 तासात चांदीच्या दरात 7,070 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे .

जागतिक बाजारात अनिश्चितता,सोन्याची मागणी वाढली

अमेरिका चीन व्यापार तणाव आणि अमेरिकन शटडाऊनया दोन घडामोडींचा परिणाम सध्या सोन्या-चांदीच्या किमतींवर होताना दिसतोय.जगभरातील व्यापार तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, अमेरिकेने लादलेले टॅरिफ कर, अनेक देशांमधील युद्ध परिस्थिती, व्यापारी तणाव तसेच आर्थिक अनिश्चिततेमुळे जगभरात अस्थिरता आहे .परिणामी गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्यामध्ये पैसे गुंतवत आहेत .याचा परिणाम सोन्या चांदीच्या किमतींवर झाल्याचे सांगितले जात आहे . दुसरीकडे, सणासुदीच्या काळात तसेच लग्नसराईत सोन्याच्या किमतींमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे .

देशभरात सोन्या चांदीच्या किमती कुठे किती ?

इंडियन बुलियन असोसिएशनच्या ताज्या दरानुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर आज (14 ऑक्टोबर ) 1 लाख 26 हजार 590 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे . तर तोळ्यामागे 1 लाख 47 हजार 652 रुपये ग्राहकांना द्यावे लागतात . पाहूया कोणत्या शहरात सोन्याचा (10 gm) भाव किती ?

मुंबई : प्रति 10 ग्रॅम 1,26,590
दिल्ली : 1,26,610 रु 10 ग्रॅम
कोलकाता: 1,26,660
पुणे: 1,26,870
चेन्नई: 1, 27, 240

कोणत्या देशात सर्वात जास्त सोने?

जगातील सर्वात मोठे सोन्याचे साठे रशिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये आहेत. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेच्या अहवालानुसार, सायबेरिया, रशिया आणि पश्चिम ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलियामध्ये सोन्याचे खाणकाम मोठ्या प्रमाणात आहे. 2024 मध्ये रशियाचे सोन्याचे उत्पादन दरवर्षी अंदाजे 310 मेट्रिक टन असल्याचा अंदाज होता.

ऑस्ट्रेलियामध्ये अंदाजे 12000 मेट्रिक टन सोन्याचे साठे असल्याचा अंदाज आहे, ज्यामध्ये वार्षिक सोन्याचे उत्पादन अंदाजे 320 ते 330  मेट्रिक टन आहे. त्यानंतर कॅनडा आणि चीन आहेत, ज्यांचे अंदाजे अनुक्रमे अंदाजे 3200 मेट्रिक टन आणि 3100 मेट्रिक टन साठे आहेत. अमेरिकेकडेही अंदाजे 3000 मेट्रिक टन सोन्याचे साठे आहेत.

आणखी वाचा

Comments are closed.