सोने आणि चांदीच्या दरात घसरण, भांडवली बाजारात तेजी, मुंबई- नवी दिल्लीतील प्रमुख दर जाणून घ्या

सोन्याची किंमत आज मुंबई: अमेरिकेतली केंद्रीय बँक यूएस फेडकडून दरांमध्ये कपात करण्याचे संकेत मिळाल्यानं आणि आशियाई आणि भारतीय भांडवली बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. यामुळं गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारात गुंतवणुकीला प्राधान्य दिलं. यामुळं सोन्याची मागणी घटल्यानं सोने दर घटले आहेत. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर 57 रुपयांनी घसरले आहेत. सोने दरात घसरण झाले असले तरी ते 1 लाखांच्या दरम्यान कायम आहेत.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर एका तोळ्याचे सोन्याचे दर सकाळी साडे दहा वाजता 100327 रुपये होते. शुक्रवारी सोन्याचे दर 100384 रुपये एक तोळा होते.

सोन्याच्या दरात घसरण

इंडियन बुलियन असोसिएशनच्या माहितीनुसार गेल्या आठवड्याच्या कारभाराच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 22 ऑगस्ट रोजी 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 99360 रुपये इतका आहे. तर, चांदीचे दर आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सकाळी साडे दहा वाजता 116002 रुपये एक किलोवर होते. चांदीच्या दरात 234 रुपयांची घसरण झाली आहे. शुक्रवारी इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार एक किलोचा दर 112690 रुपये आहे.

सोने आणि चांदीचे दर कसे ठरतात?

सोने आणि चांदीच्या दरात दररोज अनेक कारणांमुळं बदल होत असतात. यामध्ये प्रामुख्यानं डॉलर-रुपया विनिमय दर, आयात शुल्क आणि कर, जागतिक बाजाराची स्थिती याशिवाय भारतातील सोन्याची मागणी महागाई आणि सणांच्या काळात सोन्याची मागणी वाढते त्याचा परिणाम सोन्याच्या दरांवर होत असतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने आणि चांदीचे दर अमेरिकन डॉलरमध्ये ठरते. तर, जेव्हा डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर होतो तेव्हा भारतात सोने महाग होते.

याशिवाय भारत सोन्याचा सर्वात मोठा सोने आयात करणारा देश आहे. याशिवाय आयात शुल्क, वस्तू आणि सेवा कर याशिवाय इतर कर यामुळं सोन्याचे दर वाढतात. जागतिक स्तरावर युद्ध आणि आर्थिक मंदी किंवा  व्याज दरातील बदल याशिवाय यासारख्या अनिश्चित परिस्थितीत गुंतवणूकदार गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय सोन्याची निवड करतात. यामुळं सोन्याची मागणी वाढती आणि किंमत वाढते.

भारतात सोन्याचं सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व देखील आहे. लग्न,  सणांच्या काळात सोन्याची मागणी वाढते. सोने महागापासून वाचण्याचं साधन मानलं जातं. शेअर बाजारात किंवा गुंतवणुकीच्या इतर पर्यायात जेव्हा अस्थिरता वाढते तेव्हा गुंतवणूकदार सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित पर्याय म्हणून त्यात गुंतवणूक करतात.

मुंबईसह 10 शहरांमधील सोन्याचे दर

लखनौ, नवी दिल्लीतील 22 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 93200 रुपये असून 24 कॅरेट सोन्याचा दर  101660 रुपये आहे. बंगळुरु, मुंबई,पुणेकोलकाता, हैदराबाद, चेन्नई तील 22 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 93050 रुपये असून 24 कॅरेट सोन्याचा दर  101510 रुपये आहे.इंदौर,अहमदाबादमधील 22 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 93100 रुपये असून 24 कॅरेट सोन्याचा दर  101560 रुपये आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.