दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनं खरेदी, आजचा भाव किती? गतवर्षी किती होता, पुण्याचे सराफ सांगतात


पुणे : विजयादशी दसरा (Dasara) म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक आणि शुभ मुहूर्त असल्याने गाडी, घर आणि सोनं खरेदीसारख्या महत्त्वाच्या वस्तू खरेदी करण्यात येतात. त्यामुळे, गाडीचे शोरोहॅमघराचे प्रकल्प आणि सोन्याच्या दुकानात ग्राहकांची मोठी गर्दी असते. यंदा सोन्याच्या दराने लाखांचा टप्पा अगोदरच गाठला असतानाही, आता सोनं (Gold) खरेदीसाठी ग्राहक दुकानात गर्दी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर, सोन्याचे आजचे दर काय आहेत, सोनं आणखी किती महागलंययाची उत्सुकता देखील सर्वांनाच लागून आहे. त्यामुळे, आज एबीपी माझाने पुण्यातील (Pune) सराफा बाजारात जाऊन सोन्याचे प्रति तोळा दर जाणून घेतले आहेत. तसेच, गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोनं किती रुपयांनी महाग झालंयहेही माहिती घेतली आहे.

विजयादशमीच्या दिवशी सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. गेल्या 8 दिवसात सोन्याच्या किंमती 10 ते 12 हजार रुपयांनी वाढल्या आहेत. जगातील अनेक देशात सुरू असलेले युद्ध , अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेले निर्णय आणि जागतिक बाजारातील अस्थिरता यामुळे सोन्या चांदीच्या भावात सातत्याने वाढ होत असल्याचं मत आता तज्ज्ञांकडून व्यक्त होतं आहे. सणांचा कालावधी सुरू झाल्याबरोबरच सोनं खरेदीला सुरुवात होते आणि ते होत असताना सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.

सोन्याच्या दरात झालेली ही वाढ, ग्राहकांसाठी मात्र काहीशी अडचणीची आणि अधिक खर्चिक ठरत आहे. मात्र, तरीही ग्राहक शुभ मुहूर्त साधत सणासुदीला नक्कीच सोनं खरेदी करतात. हा साडेतीन मुहूर्तांपैकी सोनं खरेदीचा उद्याचा एक चांगला मुहूर्त आहे, त्यामुळे सोनं खरेदीलाही चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास सराफ बाजारातील विक्रेत्यांना आहे. फॅटचँड रॅंका सराफ यांच्याशी एबीपी माझाने संवाद साधला असता त्यांनी सोन्याच्या दराबाबत माहिती दिली. त्यानुसार, 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर प्रति तोळा (10 ग्रॅम) 1 लाख 21 हजार रुपया एवढा आहे, म्हणजेच गत वर्षीच्या तुलनेत यंदाच्या सोन्याच्या दरात तब्बल 44 हजारांनी महागले आहे.

काय आहेत आज सोन्या-चांदीचे दर (Gold rate today)

सोने: 1 लाख 21 हजार (10 ग्रॅम)

चांदी: 1 लाख 51 हजार (1 किलो))

गतवर्षी 2024 मध्ये विजयादशमीला काय होते सोन्या चांदीचे दर (Gold rate 2024)

सोने: 76 हजार (10 ग्रॅम))

चांदी: 93 हजार (1 किलो))

हेही वाचा

मोठी बातमी : शरद पवार-अजित पवारांची भेट, नवं कारण समोर, Y B सेंटरमधील भेटीने राजकारण ढवळलं

आणखी वाचा

Comments are closed.