सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल 8700 रुपयांनी स्वस्त, पाहा तुमच्या शहरातील ताजे दर
आज सोन्याचांदीचा भाव: सोन्या-चांदीच्या किमतीत (Gold Silver Price) शुक्रवारी (15 मे) मोठी घसरण पाहायला मिळाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने आणि चांदीच्या दरात झालेल्या या घसरणीमुळे ग्राहक आणि गुंतवणूकदारांसाठी खरेदीची मोठी संधी निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे चांदीच्या दरात तब्बल 8,790 रुपयांची घसरण झाली आहे.
MCX वर 5 जून 2026 एक्सपायरी असलेला गोल्ड फ्युचर्स वायदा व्यवहार सुमारे 1,425 रुपयांच्या घसरणीसह व्यवहार करत होता. सोने 1,60,790 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने उघडले होते. मागील सत्रात सोन्याचा भाव 1,61,978 रुपयांवर बंद झाला होता. सकाळी सुमारे 9:55 वाजेपर्यंत सोन्याचा वायदा 0.88 टक्क्यांच्या घसरणीसह 1,60,553 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने व्यवहार करत होता. सुरुवातीच्या व्यवहारात सोन्याने 1,60,992 रुपयांचा उच्चांक गाठला होता.
Silver Price Today: चांदीत मोठी पडझड
MCX वर 3 जुलै 2026 एक्सपायरी असलेल्या चांदीच्या वायद्यात 3.02 टक्के म्हणजेच तब्बल 8,790 रुपयांची घसरण झाली. चांदीचा व्यवहार 2,80,000 रुपयांवर सुरू झाला होता. दिवसातील व्यवहारादरम्यान चांदीने 2,83,219 रुपयांचा उच्चांक गाठला. दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे 10 ग्रॅम चांदीचा दर 2,900 रुपये आहे. तर 100 ग्रॅम चांदी खरेदीसाठी ग्राहकांना 29,000 रुपये मोजावे लागणार आहेत. चेन्नईमध्ये 10 ग्रॅम चांदीचा भाव 3,050 रुपये आहे.
Gold Price Today: प्रमुख शहरांतील सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम)
दिल्ली
24 कॅरेट – 1,60,240 रुपये
22 कॅरेट – 1,46,900 रुपये
18 कॅरेट – 1,20,220 रुपये
मुंबई
24 कॅरेट – 1,60,090 रुपये
22 कॅरेट – 1,46,750 रुपये
18 कॅरेट – 1,20,070 रुपये
चेन्नई
24 कॅरेट – 1,63,090 रुपये
22 कॅरेट – 1,49,500 रुपये
18 कॅरेट – 1,24,700 रुपये
कोलकाता
24 कॅरेट – 1,60,090 रुपये
22 कॅरेट – 1,46,750 रुपये
18 कॅरेट – 1,20,070 रुपये
अहमदाबाद
24 कॅरेट – 1,60,140 रुपये
22 कॅरेट – 1,46,800 रुपये
18 कॅरेट – 1,20,120 रुपये
लखनौ
24 कॅरेट – 1,60,240 रुपये
22 कॅरेट – 1,46,900 रुपये
18 कॅरेट – 1,20,220 रुपये
पाटणा
24 कॅरेट – 1,60,140 रुपये
22 कॅरेट – 1,46,800 रुपये
18 कॅरेट – 1,20,120 रुपये
हैदराबाद
24 कॅरेट – 1,60,090 रुपये
22 कॅरेट – 1,46,750 रुपये
18 कॅरेट – 1,20,070 रुपये
तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचाली, डॉलरच्या किमतीतील बदल आणि गुंतवणूकदारांचा कल यामुळे सोन्या-चांदीच्या दरात मोठी चढ-उतार होत आहे. आगामी काळातही बाजारातील अस्थिरता कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
LPG Price Hike: मोठी बातमी: पेट्रोल-डिझेलनंतर घरगुती गॅस सिलेंडरची किंमतही वाढणार?
Comments are closed.