विकास लवांडेंवर शाईफेक; आता संग्राम भंडारे म्हणाले, ‘आम्हाला आनंद नाही पण, धर्माच्या कामात आडवा

राजगुरुनगर : आपलाच हिंदू हा हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी आडवा येतो तेव्हा आम्हाला एका हिंदूला दुसऱ्या हिंदूच्या डोक्यावर शाई टाकावी लागते, असं वक्तव्य संग्राम बापू भंडारे (Sangram Bhandare) यांनी पुण्यात बोलताना केलं. आज आम्ही लव्ह जिहादच्या विरोधात  भिडतोय, मात्र आम्हाला इतकं दुःख होतं की जेव्हा आपलाच हिंदू हा हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी आडवा येतो, तेव्हा आम्हाला एका हिंदूला दुसऱ्या हिंदूच्या डोक्यावर शाई टाकावी लागतेय, तेव्हा आम्हाला सुद्धा दुःख होतं आम्हाला आनंद झाला असे नाही, असंही ते पुढे म्हणालेत, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते विकास लवांडे यांच्यावरती शाईफेक झाली होती, त्या प्रकरणावरून लवांडे यांनी संग्राम बापू भंडारे यांच्यावरती हल्लाबोल केला होता. (Sangram Bhandare)

संग्राम भंडारे यांनी पुण्यातील राजगुरुनगर येथे कार्यक्रमात बोलताना म्हटलं की, आम्हाला औरंग्याला ठोकण्यात मजा आहे आम्हाला अब्दुलाला फाडण्यात मजा आहे. आम्हाला हिंदूंची डोके काळे करण्यात कोणताही आनंद नाही. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये फितूर झाल्यानंतर खंडोजी खोपडे यांचे हातपाय काढावे लागले. सूर्याजी पिसाळला शिक्षा द्यावी लागली. हे फितूर धर्मासाठी घातक असतात, त्यांना शिक्षा द्यावी लागते आणि त्यामध्ये जरी स्वतःचा बाप आला तरी तिला सोडायचं नसतं. छत्रपती संभाजी महाराज हे धर्मासाठी लढले मागे सरले नाही. धर्माला मध्ये कोणी आला मग त्याला धडा शिकवावा लागतो त्याला पर्याय नसतो. पुण्याच्या राजगुरुनगर येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त कार्यक्रमात कीर्तनकार संग्राम बापू भंडारे महाराज बोलत होते.(Sangram Bhandare)

Sangram Bhandare :  नेमकं काय म्हणाले संग्राम बापू भंडारे?

तुम्ही इतिहास बघा. आपल्याला जो दगा फटका झाला तो आपल्याच लोकांमुळे झाला. आज आम्ही लव जिहादच्या विरोधात लढत आहे त्या विरोधात पेटतोय, लव जिहादच्या विरोधात भिडतोय, पण दुःख होतं जेव्हा आपलाच हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करायला हिंदू अडचण आणतो, आडवा येतो, तेव्हा नाईलाज असतो, एका हिंदूला दुसऱ्या हिंदूंच्या डोक्यावर शाई टाकावी लागते, तेव्हा आम्हाला सुद्धा दुःख होतं, आम्हालाही तेव्हा फार आनंद झाला अशातला भाग नाही, आम्हाला औरंग्याला ठोकण्यात मजा आहे आम्हाला अब्दुलाला फाडण्यात मजा आहे, आम्हाला हिंदूंची डोकी काळी करण्यात किंचितही आनंद नाही, पण काय करणार, खंडोजी खोपडे सारख्यांचे हातपाय तोडावे लागणार, सूर्याजी पिसाळ यांना शिक्षा द्यावीच लागली, हे फितूर शेवटी धर्मासाठी घातक असतात, आणि शेवटी धर्माच्या आड सख्खा बाब जरी आला तरी त्याला सोडायचा नसतो हे आपल्याला शिकवलेलं आहे, असंही ते म्हणाले.

तर भाऊबंद की जरी धर्माच्या वाटेवर आडवे आली तरी त्यांना सोडायचं नाही, काय शिकवलं महाभारताने धर्मासाठी आप्तांशी देखील लढले, मागे सरले नाहीत, पुढचा जर धर्माला अडवा येत असेल तर तो भाऊबंद असू दे, नातेवाईका असू द्या, त्याला धडा शिकवलाच पाहिजे, आणि म्हणून करावं लागतं. पर्याय नसतो, जर कोण म्हणत असेल वारकरी संप्रदायाचा आणि हिंदू धर्माचा काही संबंध नाही जर कोणी म्हणत असेल वारकरी संप्रदायाचे भगवीकरण करायचं काम सुरू आहे, जर कोणी म्हणत असेल जय श्रीराम हा राजकीय मंत्र आहे, तर आज मी तुम्हाला सांगतो जागेवर त्याचं तोंड काळ करायचं काम करा, त्याला सोडू नका, हिंदू धर्माचाच वारकरी संप्रदाय वेद मार्गे मुनी गेले त्याचा मार्गे चाललो. वेद मार्गाने चालणारा वारकरी संप्रदाय तो हिंदू धर्माचाच एक भाग आहे, आणि वारकरी संप्रदायाचा भगवीकरण करू नका म्हणत आहात, आम्ही कोण वारकरी संप्रदायाचे भगवीकरण करणारे, वारकरी संप्रदाय 700 वर्षांपूर्वी जेव्हा आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी स्थापन केला, तेव्हाच स्वतःच्या हातात आणि वारकऱ्यांच्या हातात जो झेंडा दिला, तो झेंडा भगवा होता, आज आळंदी पंढरपूरच्या वाटेने वारकरी कोणत्या झेंडा फडकवत नेतात, तर तो भगवा झेंडा फडकवतात, ते आमचं हिंदुत्व आहे. जय श्रीराम हा राजकीय मंत्र आहे असं म्हणणाऱ्याच्या डोक्यावर फक्त शाई नका टाकू, त्याच्या तोंडात शेण कोंबा, असे पुढे संग्राम बापू भंडारे यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा

Comments are closed.