सोने-चांदीच्या दरात सर्वात मोठी घसरण; सात महिन्यांतील नीचांकी पातळीवर भाव, जाणून घ्या घसरणीमागच
मुंबई: आज (शुक्रवार, २६ जून रोजी) सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत पुन्हा एकदा घसरण (Gold-Silver Rate Today) पाहायला मिळत आहे. जागतिक बाजारपेठेतील मोठ्या प्रमाणावरील विक्री आणि व्याजदरांबाबत अमेरिकन फेडरल रिझर्व्हने (US Fed) घेतलेली कडक भूमिका यामुळे गेल्या २-३ दिवसांपासून बाजार (Gold-Silver Rate Today) दबावाखाली आहे. याचा थेट परिणाम मौल्यवान धातूंच्या दरांवर झाला असून किमती सातत्याने खाली येत आहेत.(Gold-Silver Rate Today)
Gold-Silver Rate Today: कालच्या तुलनेत किती घसरले सोन्याचे भाव?
२४ कॅरेट सोने: आज २४ कॅरेट सोन्याचा भाव कालच्या (२५ जून) तुलनेत प्रति १० ग्रॅम ९४० रुपयांनी घसरला आहे. काल याची किंमत १,४१,०७० रुपये होती, ती आज घटून १,४०,१३० रुपयांवर आली आहे.
२२ कॅरेट सोने: याचप्रमाणे २२ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ८६० रुपयांची घसरण झाली आहे. काल १,२९,२२० रुपयांवर असलेले सोन्याचे भाव आज १,२८,३६० रुपयांवर आले आहेत.
Gold-Silver Rate Today: चांदीची सद्यस्थिती काय?
चांदीच्या किमतीत काल (२५ जून) प्रति किलो तब्बल १०,००० रुपयांची मोठी घसरण झाली होती. त्या तुलनेत आज चांदीच्या भावात प्रति किलो १०० रुपयांची किरकोळ घसरण दिसत आहे. काल चांदीचा दर प्रति किलो २,३५,००० रुपये होता, तो आज २,३४,९०० रुपये प्रति किलो एवढा आहे.
Gold-Silver Rate Today: भविष्यात पुन्हा भाव वाढणार का?
जागतिक ब्रोकरेज फर्म UBS (Union Bank of Switzerland) ने वर्तवलेल्या अंदाजानुसार, सोने आणि चांदीच्या किमतीत भविष्यात पुन्हा मोठी तेजी येऊ शकते. जानेवारी २०२६ मधील आपल्या सर्वोच्च पातळीवरून सोने आतापर्यंत २८% टक्क्यांनी घसरले आहे, परंतु UBS च्या मते ही घसरण तात्पुरती आहे. या वर्षाच्या अखेरीस आंतरराष्ट्रीय बाजारात सोने ५,५०० डॉलर प्रति औंस पर्यंत झेप घेऊ शकते. म्हणजेच, पुढील सहा महिन्यांत सोन्याचे दर सध्याच्या पातळीवरून तब्बल ३६% टक्क्यांनी वाढू शकतात.
Gold-Silver Rate Today: सोने-चांदीच्या दरात घसरण होण्यामागची प्रमुख कारणे
जागतिक बाजारात अमेरिकन डॉलर मजबूत झाला असून तो १३ महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर (१०१.५०) पोहोचला आहे, ज्यामुळे सोन्यावर दबाव वाढला आहे. त्यातच, अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात कपात करण्याची शक्यता कमी असून, उलट आगामी काळात व्याजदर वाढण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार सोन्यामधून आपला नफा काढून घेत (प्रॉफिट बुकिंग) असल्याने किमती घसरत आहेत.
अमेरिकन डॉलर मजबूत होणे : डॉलर मजबूत झाल्याने इतर चलनधारकांसाठी सोने आणि चांदी महाग झाली. त्यामुळे जागतिक मागणी कमी झाली आणि किमतींवर दबाव वाढला.
भूराजकीय तणाव कमी होणे : जागतिक तणाव कमी झाल्याने सुरक्षित गुंतवणूक (Safe Haven) म्हणून सोन्या-चांदीची मागणी घटली.
गुंतवणूकदारांचा कल बदलणे : अनेक गुंतवणूकदारांनी सोने-चांदीमधील गुंतवणूक कमी करून शेअर बाजार आणि इतर जोखमीच्या मालमत्तांकडे निधी वळवला.
फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर कपातीबाबत अनिश्चितता : अमेरिकन फेडरल रिझर्व्ह व्याजदर कधी आणि किती कमी करेल, याबाबतचा विश्वास कमी झाला आहे.
उच्च व्याजदर दीर्घकाळ कायम राहण्याची शक्यता : व्याजदर जास्त काळ उच्च पातळीवर राहतील, या अपेक्षेमुळे मौल्यवान धातूंवर अधिक दबाव निर्माण झाला.
व्याज मिळणाऱ्या गुंतवणुकीचे वाढलेले आकर्षण : उच्च व्याजदरामुळे व्याज देणाऱ्या गुंतवणुकी अधिक आकर्षक ठरत आहेत. त्यामुळे व्याज न देणाऱ्या सोने आणि चांदीसारख्या मालमत्तांकडे गुंतवणूकदारांचा कल कमी होत आहे.
Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!
Comments are closed.