मद्यधुंद पोलीस कर्मचाऱ्याची भर चौकात एका इसमाला मारहाण; व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल

गोंडिया क्राइम न्यूज: गोंदिया जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात चक्क पोलीस कर्मचाऱ्याने छत्तीसगढ राज्यातील एका इसमाला बेदम मारहाण (Crime News) केल्याची घटना गोंदिया जिल्ह्यात उघडकीस आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील डूग्गीपार पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेला कांचन राहुले हा पोलीस कर्मचारी रस्त्याने जात असताना छत्तीसगड राज्यातील सुनीतकुमार मडावी याने कट मारून ओव्हरटेक केल्याच्या आरोप केलाय.

पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह

दरम्यान, याच कारणावरून पोलीस कर्मचारी कांचन राहुले याने  सुनीतकुमार मडावीला जबर  मारहाण केली. ही घटना 19 मे 2025 रोजी घडली. त्यानंतर सुनीतकुमार मडावी याने पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. यावर गोंदिया पोलिसांनी संबंधित पोलिसावर कारवाईचा बडगा उगारत निलंबित केलं असून सदर पोलीस कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती देखील पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहेत.

पोलीस कर्मचाऱ्याला नोकरीतून बडतर्फ करावं- सुनीतकुमार मडावी

तर दुसरीकडे,  पोलीस कर्मचाऱ्याने मला चुकीच्या पद्धतीने मारहाण केली आणि आता हा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्यामुळे माझी प्रतिष्ठा समाजामध्ये मलीन झाल्याचा आरोप करीत संबंधित कर्मचाऱ्याला नोकरीतून बडतर्फ करावं, अशी मागणी सुनीतकुमार मडावी याने पोलीस विभागाकडे केली आहे.

मठाधिपती मधील वाद, मठाचे अध्यक्ष व सचिव यांनी जीवे मारण्याची धमकी

बीडच्या केज तालुक्यातील सासुरा येथे असलेल्या संत एकनाथ महाराज मठ संस्थानच्या वादातून उत्तरअधिकारी असलेल्या केशव महाराज शास्त्री यांना या मठाचे अध्यक्ष व सचिव यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणात केज पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.

केशव महाराज शास्त्री यांनी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. हे उपोषण केल्याचा राग मनात धरून संस्थानचे अध्यक्ष रतन महाराज मुंडे,सुसेन भोसले, राजेन भोसले तसेच ज्ञानेश्वर भोसले यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार केशव महाराज शास्त्री यांनी दिली होती त्यावरून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान दोन दिवसापूर्वी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झाडावर चढत या संस्थांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी व दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यासाठी आंदोलन केले होते.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Comments are closed.