अल्पवयीन मुलीचं मध्य प्रदेशात अपहरण करुन अत्याचार, मुस्लिम तरुणावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
गोंदिया क्राईम न्यूज : गोंदियामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी एका मुस्लिम तरुणावर पोक्सो (POCSO) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी तरुणाला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी सकल हिंदू समाजानं केली आहे. पोलीस निरीक्षकांना निवेदन देत कारवाई झाली नाही तर आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे.
आरोपीने पीडित मुलीला मध्यप्रदेश राज्याच्या बालाघाट येथे नेऊन अत्याचार केला
गोंदियाच्या रामनगर पोलिसांनी एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी एका मुस्लिम तरुणाविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. आरोपीने पीडित मुलीला मध्यप्रदेश राज्याच्या बालाघाट येथे नेऊन तिच्यावर अत्याचार केले. त्याची माहिती पीडित मुलीने आपल्या वडिलांना दिली होती. त्यानंतर वडिलांनी रामनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली आहे. आरोपीच्या विरोधात पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करून आज न्यायालयात हजर केले आहे. या प्रकरणानंतर सकल हिंदू समाजाने आक्रमक भूमिका घेतली असून आज शेकडो हिंदू समाज बांधवांनी पोलीस स्टेशन रामनगर चे पोलीस निरीक्षक प्रवीण बोरकुटे यांची भेट घेत या प्रकरणात कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा सकल हिंदू समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा विश्व हिंदू परिषद तसेच सकल हिंदू समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.
बीडच्या केजमध्ये बघण्याच्या किरकोळ कारणावरुन तरुणालाजबर मारहाण
बीडच्या केज तालुक्यातील कुंबेफळ येथे एका युवकाला बघण्याच्या किरकोळ कारणावरून तिघांनी लोखंडी रॉड, केबल व लाकडाने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. घरासमोर उभा असलेल्या निसार शेख याला माझ्याकडे काय बघतोस? मी तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत तिघांनी मारहाण केली. यावेळी या भांडणाचे व्हिडिओ काढत असल्याचे लक्षात आल्यानंतर निसारच्या पत्नीच्या हातातील मोबाईल हिसकवून घेऊन हल्लेखोर पळून गेले. नातेवाईकांच्या मदतीने जखमी निसार याला केज उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचारानंतर अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. दरम्यान याप्रकरणी निसार शेख यांची पत्नी शाहीन शेख हिच्या तक्रारीवरून रोहित दीपक थोरात, स्वप्निल दीपक थोरात आणि ज्ञानेश्वर अशोक थोरात या तिघांविरुद्ध युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करत आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.