भर रस्तात बर्निंग ट्रकचा थरार! पशुखाद्य घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग; आगीत ट्रकसह माल जळून भस्मसात

गोंडिया न्यूज: गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यात बर्निंग ट्रकचा थरार पाहायला मिळालाय. छत्तीसगड राज्यातून गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसाकडे पशुखाद्य घेऊन एक ट्रक येत असताना अचानक दरेकसा जवळ या ट्रकला भीषण आग लागली. अल्पावधीतच या आगीने रौद्ररुप धारण केलं आणि या आगीत ट्रक मधील पूर्णतः पशुखाद्य जळून खाक झालंय. घटनेची माहिती सालेकसा येथील अग्निशमन दलाला देण्यात आली. मात्र तोपर्यंत आगीत पूर्णतः ट्रक व पशुखाद्य जळून खाक झालं होतं. त्यानंतर आगीचे आणि काळ्या धुव्याचे लोट दुरवरून ही दिसू लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, या घटनेची नोंद सालेकसा पोलिसांनी घेतली असून पुढील प्रक्रिया सुरू  करण्यात आली आहे.

मृत्यूशी झुंज देणाऱ्या आयुध निर्माणीच्या कर्मचाऱ्याचा ३३ दिवसानंतर मृत्यू

भंडाऱ्याच्या जवाहरनगर येथील आयुध निर्माणी कंपनीत 24 जानेवारीला झालेल्या ब्लास्टमध्ये 8 कामगारांचा मृत्यू झाला होता. तर, 5 कामगार सुदैवानं थोडक्यात बचावले होते. या 5 कामगारांपैकी जगदीश बॅनर्जी यांच्यावर नागपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना आज त्यांचा मृत्यू झाला. मागील 33 दिवसांपासून त्यांची मृत्यूची झुंज सुरू होती. आयुध निर्माणी कंपनीच्या ज्या एलपीटी विभागात हा ब्लास्ट झाला तिथं जगदीश बॅनर्जी हे फिटर म्हणून कार्यरत होते. बॅनर्जी यांच्या मृत्यूमुळं आयुध निर्माणी कंपनीत झालेल्या ब्लास्ट मधील मृतांचा आकडा आता नऊवर पोहोचला आहे.

गडचिरोलीत रसायन मिश्रीत ताडीची विक्री?

उन्हाची चाहूल लागताच गडचिरोली जिल्ह्यात ताडी विक्रीचा हंगाम जोमाने सुरू झालाय. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेकांना एक प्रकारे रोजगार मिळाला आहे. मात्र ताडी विक्रीच्या नावावर शहरी भागामध्ये सर्रास हायड्रोक्लोराइड या रसायन मिश्रित ताडीची विक्री केली जात असताना कुठलीही कारवाई होत नसल्याने एक प्रकारे आरोग्याशी खेळ सुरू असल्याने दिसून येते. गडचिरोलीच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात ताड फळाचे झाड असून या झाडाचा रस काढून विक्री केली जाते यालाच ताडी म्हणतात. सकाळी आणि सायंकाळी अशा तीन वेळात ताडी काढली जाते. शुद्ध ताडी आरोग्यासाठी फायद्याची असल्याने अनेक नागरिक ताडी प्राशन करतात. मात्र अलीकडे यादी विक्रीला व्यावसायिकपणा आल्याने शहरी भागामध्ये ताडीच्या नावावर सर्रास हायड्रोक्लोराइड पावडर मिश्रित ताडीची विक्री केली जात आहे. या ताडीमुळे मोठ्या प्रमाणात नशाही येत असून आरोग्यावरही त्याचे घातक परिणाम होतात. मात्र अन्न प्रशासनाकडून कुठलीही कारवाई होताना दिसत नाही. मनुष्यबळ कमी असल्याने फिल्डवर जाता येत नाही. तक्रार आलीच तर कारवाई करू, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

हे ही वाचा

अधिक पाहा..

Comments are closed.