मी मंगळसूत्र चोरांच्या विरोधात लढत नाही म्हणणाऱ्या जयंत पाटलांवर पडळकरांचा बोचरा पलटवार
सांगली : भाजप आमदार गोपीचंद पडळकर (gopichand padalkar) आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यातील वाद काही नवा नाही. मात्र, गेल्या काही दिवसांत जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यातील वाद हमरी-तुमरीवर आल्याचं पाहायला मिळत आहे. विधिमंडळातील राड्यानंतर गोपीचंद पडळकर हे शांत असल्याचे दिसून येते. त्यातच, आता जयंत पाटील यांनी नाव न घेता पडळकरांवर बोचरी टीका करत त्यांना डिवचलं. मी मंगळसूत्र चोरांच्या विरोधात लढत नाही. ज्या मतदारसंघात वोट चोरी झाली तिथं राजीनामा द्या आणि परत एकदा निवडणूक लढवा, असे जयंत पाटील यांनी म्हटलं होतं. आता, गोपीचंद पडळकरांनी त्यांच्या स्टाईलने जयंत पाटलांवर (Jayant patil) पलटवार केला आहे. मी एका शिक्षकाच्या पोटी जन्माला आलो आहे, आणि हा एका चोराच्या पोटी जन्माला आला आहे, असे पडळकर यांनी म्हटले.
मी मंगळसूत्र चोरांच्या विरोधात लढत नाही हा माझा प्रॉब्लेम आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले होते. त्यासंदर्भात पडळकर यांना विचारले असता, त्यांनी जयंत पाटलांवर बोचरी टीका केली. जयंतराव पाटील हा मुळात बिनडोक माणूस आहे, आता जतमध्ये येऊन एकी करुन मला थांबवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मतचोरी झाली असं जयंत पाटलांचं म्हणणं आहे. मग 1990 पासून सलग मतचोरी करून निवडून येत आहे का? इतका काय दिवा लावला याने जो सलग इतके टर्म निवडून आला. दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन लढायला हिंमत लागते ती हिंमत जयंतराव पाटील यांच्यात नाही, असे म्हणत गोपीचंद पडळकर यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला.
माझ्यावर त्यावेळी कशा पद्धतीने आरोप झाले हे सगळ्यांना माहिती आहे. मी एका शिक्षकाच्या पोटी जन्माला आलो आहे, आणि हा एका चोराच्या पोटी जन्माला आला आहे. जयंतराव पाटील छोटा दरोडा टाकत नाही, राज्यातल्या अनेक कारखान्यांवर यांनी दरोडा टाकला आहे. संभाजी पवार आप्पा यांचा कारखाना जयंत पाटील यांनी ढापला. जयंत पाटील हा दोनशे-पाचशे कोटींच्या पुढचा दरोडा टाकणारा दरोडेखोर आहे. ज्या कार्यक्रमात जयंतराव पाटील बोलला तो कार्यक्रम ख्रिश्चन आणि मुस्लिम समाजाचा होता. जयंत पाटील यांची हिंदू विरोधी भूमिका आहे, इस्लामपूरचे ईश्वरपूर करताना देखील या माणसाने विरोध केला. उरण ईश्वरपूर करा असं याचं म्हणणं आहे, पण नोटिफिकेशन निघाल्यानंतर उरण ईश्वरपूरच होणार आहे इतकं सुद्धा या फॉरेन रिटर्न माणसाला कळत नाही का? अशा शब्दात पडळकरांनी पाटलांवर बोचऱ्या शब्दात टीका केली.
पडखळकरांकडून जयंत पाटलांना चॅलेंज
न शिकलेल्या आमच्या मेंढपाळाला सुद्धा हे कळतं मग याला कळत नाही का? हजामती करतो का? इतकंही कळत नाही, महाराष्ट्रात इतकी वर्षे दाढ्या केल्या का? आता त्यांनी जतमध्ये लक्ष घातले, पैसे वापरून लोकांना एकत्र करत आहे. पण किती ताकद लावायची तेवढी लाव, किती पैसे वाटायचे तेवढे वाट, लोकांना माहिती आहे विकास देवाभाऊंच्याच नेतृत्वात होणार आहे. जयंत पाटील याला माझं आव्हान आहे, वसंतराव पाटील आणि राजाराम पाटील यांचा तीन पिढ्यांचा वाद कशामुळे आहे ते जाहीर करावं, असं चॅलेंजच दिलं आहे. माझ्यावर काही बोल मला फरक पडत नाही. माझ्या मतदारसंघातल्या जनतेला माहिती आहे. माझ्यावर केस करणारे दोघे देवाघरी गेले, एक कधी जाईल हे माहिती नाही. जयंत पाटील यांनी जतमधून लोकसभेसाठी मुलाचं नाव पुढे केलं, पण सर्वेत कुठं नाव येत नव्हतं. त्यानंतर हातकणंगले मधून मुलग्याचे नाव लोकसभेसाठी पुढे केलं पण तिकडे सुद्धा सर्व्हेत कुठेच नाव येत नव्हतं. दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन लढण्यासाठी धाडस लागतं ते धाडस जयंत पाटलाकडे नाही, असे चॅलेंजच पडळकर यांनी जयंत पाटलांना दिले.
हेही वाचा
‘सरसकट’ कुणबीसाठी मनोज जरांगेंचं आमरण उपोषण; पण हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाचे निकाल काय सांगतात?
आणखी वाचा
Comments are closed.