जरांगेचं आंदोलन आटोपत घेऊन त्याला गावी धाडावं, गुणरत्न सदावर्तेंची मागणी
मुंबई : ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांना अटक करण्याची मागणी केली आहे. माजी न्या. संदीप शिंदे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेत मनोज जरांगेंवर हल्लाबोल केला. यावेळी सदावर्ते यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर देखील टीका केली. मनोज जरांगे याचे लाड बंद करता, सहा वाजता आंदोलन संपल्यानंतर त्याला उचला आणि अटक करा, अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. सदावर्ते यांनी सातत्यानं मनोज जरांगे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली
गुणरत्न सदावर्ते काय म्हणाले?
मनोज जरांगे याचे जे मसिआ आहेत त्यांना कधीही गणेशभक्त माफ करणार नाहीत. स्टेजवर जरांगे अर्वाच्च भाषेत बोलतो. काल स्टेजवर जरांगे बोलला की धनगर समाजाच्या ** मध्ये बांबू घातला. एका समाजाचा अपमान करण्याचा अधिकार याला आहे का? न्यायमूर्ती शिंदे समोर जरांगे म्हणाला की हे सरकार चाबरं आहे… चाबऱ्या झ*न्याचं आहे. उद्धव ठाकरे शरद पवार तुम्ही हे ऐकताय आणि त्याचा लाड तुम्ही करताय? मनोज जरांगे सगळ्यांचा अपमान करतो सरकारचा अपमान करतो, तुम्हाला याचा कळवळा आहे, असा सवाल गुणरत्न सदावर्ते यांनी केला.
मुंबई महापालिकेने सेल्फी पॉइंट इथे केलेल्या पाँडच्या पाण्यामध्ये तुम्ही अंघोळ करता, तुम्ही मराठा बांधव नाहीत तुम्ही स्पॉन्सर्ड कार्यकर्ते आहात. राज्यातले सर्व मराठा मराठी गेमिंग करत आहेत का? मराठी नसलेला मुख्यमंत्री असला की मग चुळबूळ चुळबूळ करत आहेत. जरांगेची भाषा ही गावगाड्याची भाषा नाही तर माजुरडी भाषा आहे, अशी टीका गुणरत्न सदावर्ते यांनी केली.
गुणरत्न सदावर्ते पुढं म्हणाले की महाराष्ट्र कायद्याचे राज्य आहे. आज सहा वाजता आंदोलन संपल्यानंतर जरांगेचे लाड बंद करा. त्याला उचला आणि अटक करा. राज्य कायद्याचं आहे ,कायद्यापेक्षा जरांगे मोठा नाही, त्याला अटक करून कोर्टासमोर हजर करा अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली.
माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे हे जरांगे समोर हाताश दिसत होते. जरांगे म्हणत होता मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण द्या, मात्र ते त्यावर काहीच बोलत नव्हते त्यांनी कोर्टात असल्याप्रमाणे नो असं सांगायला हवं होतं. जरांगेचं आंदोलन आटोपत घेऊन त्याला त्याच्या गावी धाडावे, अशी मागणी देखील सदावर्ते यांनी केली.
https://www.youtube.com/watch?v=no973ng0zbk
आणखी वाचा
Comments are closed.