‘ॲनिमल’ चित्रपटानंतर रणबीरला ‘राम’ म्हणून स्वीकारता येणे कठीण; रामानंद सागर यांच्या नातवाचे वक्तव्य चर्चेत

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नितेश तिवारी यांच्या रामायण या चित्रपटातील रणबीर कपूरच्या कास्टिंगवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. टीव्हीवर रामायण ही मालिका अजरामर करणारे रामानंद सागर यांच्या नातवाने शिव सागर यांनी रामाच्या कास्टिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. रणबीर कपूरने ‘ॲनिमल’ या चित्रपटात साकारलेल्या भूमिकेमुळे रणबीरला राम म्हणून पाहणे हे फार उचित नसल्याचे म्हटले आहे. ‘रामा’च्या भूमिकेसाठी दुसऱ्या एखाद्या नव्या चेहऱ्याची निवड अधिक योग्य ठरली असती असे मत त्यांनी एका मुलाखतीमध्ये व्यक्त केले.

शिव सागर यांनी नुकतीच एएनआयला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांनी त्यांची वैयक्तिक भूमिका स्पष्ट केली आहे. रणबीरला अॅनिमल नंतर प्रभू रामाच्या भूमिकेमध्ये स्विकारणे हे जड जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सागर यांच्या मते रामासारख्या संवेदनशील आणि श्रद्धेय असलेल्या पात्रासाठी दुसरा कलाकार निवडणे अधिक उचित ठरले असते.

“रणबीर हा नक्कीच एक उत्तम अभिनेता आहे. परंतु माझ्या मतानुसार मात्र रामाच्या भूमिकेसाठी दुसरा एखादा चेहरा निवडायला हवा होता. यश आणि साई पल्लवी यांच्यावर त्यांच्या आधीच्या भूमिकांचा तितका भार नसल्याचेही यावेळी शिव सागर यांनी म्हटले आहे. रामाच्या भूमिकेसाठी रणबीरची निवड करणे हा व्यावसायिक भाग असू शकतो. तसेच मार्केटिंग करणेही सोपे होईल असा विचार असू शकतो. त्यामुळेच चित्रपटाची प्रसिद्धीही अवलंबून आहे. या सर्व बाजू पाहता, रामाच्या भूमिकेसाठी इतर कोणत्याही कलाकाराची निवड ही अधिक उत्तम आणि परिणामकारक ठरली असती.

चित्रपटात झालेले कास्टिंग त्याचबरोबर वेशभूषेतील काही बाबींबद्दल त्यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली. मात्र प्रेक्षकच खरे मायबाप आहेत तेच काय चांगलं काय वाईट हे स्विकारतील असेही यावेळी ते म्हणाले.

Comments are closed.