हार्दिक पंड्याचे पाच महिन्यांनंतर पुनरागमन, हिंदुस्थान ‘अ’ संघात एकदिवसीय मालिकेसाठी निवड, ऋतुराज वन डेचा कर्णधार; पडिक्कलवर कसोटीची धुरा
पाच महिन्यांपासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर असलेल्या हार्दिक पंड्याच्या पुनरागमनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. ऑस्ट्रेलिया ‘अ’विरुद्धच्या मालिकेसाठी हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) इंडिया ‘अ’ संघ जाहीर केला असून तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी हार्दिकची संघात निवड करण्यात आली आहे. मात्र मैदानावर उतरण्यासाठी त्याला अद्याप फिटनेसची अंतिम परीक्षा द्यावी लागणार आहे.
वन डे संघाची धुरा मराठमोळय़ा ऋतुराज गायकवाडकडे सोपविण्यात आली आहे, तर देवदत्त पडिक्कल दोन सामन्यांच्या मल्टी-डे मालिकेत हिंदुस्थान ‘अ’ संघाचे नेतृत्व करणार आहे. साई सुदर्शन हा कसोटी संघाचा उपकर्णधार असून, पडिक्कल वन डे संघाचा उपकर्णधार असेल. हार्दिकने अखेरचा सामना 24 मे या दिवशी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळला होता. त्यानंतर दुखापतीमुळे तो बंगळुरू येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये पुनर्वसन आणि प्रशिक्षण घेत आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धांच्या धामधुमीत युवा खेळाडूंना संधी
हिंदुस्थानी संघातील प्रमुख खेळाडू आंतरराष्ट्रीय जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त असताना हिंदुस्थान ‘अ’ संघाच्या या मालिकेतून युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पातळीवरील सामन्यांचा अनुभव मिळणार आहे. आशियाई क्रीडा स्पर्धांच्या काळात ही मालिका युवा खेळाडूंसाठी आपली ताकद दाखविण्याचे व्यासपीठ ठरणार आहे. कसोटी मालिकेतील दुसरा सामना 29 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरदरम्यान खेळविला जाणार आहे. याच काळात 1 ऑक्टोबरपासून श्रीनगरमध्ये इराणी चषक स्पर्धेलाही सुरुवात होणार आहे. त्यात जम्मू-कश्मीर आणि रेस्ट ऑफ इंडिया आमने सामने येतील.
हिंदुस्थान 'अ' कसोटी संघ : देवदत्त पडिक्कल (कर्णधार), साई सुदर्शन (उपकर्णधार), अमन मोक्हाडे, आयुष पांडे, यश राठोड, शेख रशीद, पुमार पुशाग्र (यष्टिरक्षक), शम्स मुलानी, तनुष कोटियन, तुषार देशपांडे, अंशुल पंबोज, प्रफुल हिंगे, एन. जगदीशन (यष्टिरक्षक), नचिकेत भुटे, व्ही. वैश्याक.
हिंदुस्थान 'अ' एक दिवसीय संघटना: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), देवदत्त पडिक्कल (उपकर्णधार), प्रियांश आर्या, साई सुदर्शन, रजत पाटीदार, पुमार पुशाग्र (यष्टिरक्षक), निशांत सिंधू, विप्रज निगम, अर्शिन पुलकर्णी, अर्शद खान, नमन धीर, हार्दिक पंड्या, प्रभसिमरन सिंग (यष्टिरक्षक), गुरजपनीत सिंग, यश ठापूर.
Comments are closed.