आता शालेय क्रिकेटमध्येही एलिट आणि प्लेट गट, यंदा हॅरिस आणि गाइल्स शिल्ड पाच-पाच गटात होणार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रणजी करंडक स्पर्धेत ज्या पद्धतीने एलिट आणि प्लेट गटात स्पर्धा रंगते तशीच स्पर्धा आता आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा असलेल्या हॅरिस आणि गाइल्स या प्रतिष्ठsच्या स्पर्धांमध्ये पाहायला मिळणार आहे.  यंदा दोन्ही स्पर्धा प्रत्येकी पाच-पाच गटात खेळल्या जाणार असून एलिट गटात गतवेळचे अव्वल सोळा संघ आणि उर्वरित सहभागी संघ चार गटात विभागले जातील आणि या गटातील विजेते पुढील स्पर्धेसाठी एलिट गटात स्थान मिळवतील. तसेच एलिट गटात तळाला राहिलेल्या चार संघांची प्लेट गटात घसरण होईल.

शालेय क्रिकेटमध्ये जगप्रसिद्ध असलेल्या हॅरिस शिल्ड (16 वर्षाखालील) आणि गाइल्स शिल्ड (14 वर्षाखालील)या स्पर्धांमध्ये नेहमीच विश्वविक्रमी संघाचा समावेश असतो. गेल्यावर्षी हॅरिसमध्ये 200 तर गाइल्समध्ये 197 शालेय संघ खेळले होते. या स्पर्धेत काही शाळांचे दुबळे संघ असतात आणि बलाढय़ शालेय संघ त्यांचा धुव्वा उडवतात. त्यामुळे या स्पर्धेला नवे रुप देण्यात आल्याची माहिती मुंबई शालेय क्रिकेट संघटनेचे (एमएसएसए) क्रिकेट सचिव नदीम मेमन यांनी दिली.

या प्रतिष्ठsच्या आंतरशालेय स्पर्धेत तुल्यबळ संघ एकमेकांशी भिडावेत म्हणून प्रथमच पाच गट पाडण्यात येणार आहेत. गतवर्षी स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत  खेळलेल्या 16 संघांचा एलिट गट करण्यात आला असून यात चार-चार संघाचे चार गट पाडण्यात आले आहेत. प्रत्येक गटातील अव्वल उपांत्य फेरीत भिडेल आणि अंतिम विजेता संघ जेतेपदाचा मानकरी ठरेल. त्याचप्रमाणे स्पर्धेत सहभागी होणार्या उर्वरित संघांचे समान चार गट पाडले जातील. मात्र ही स्पर्धा बादफेरीत खेळविली जाणार असून चारही गटांचे विजेते पुढील स्पर्धेत एलिट गटासाठी पात्र ठरतील.  मात्र मुलींची मनोरमाबेन आपटे स्पर्धा नेहमीप्रमाणेच खेळविली जाणार आहे.

स्पर्धांसाठी २१ सप्टेंबरची डेडलाइन

मुंबई शालेय क्रीडा संघटनेने शालेय क्रिकेट स्पर्धांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 सप्टेंबर ठरवलेली आहे. शालेय क्रिकेट स्पर्धांमध्ये हॅरिस शील्ड, गाईल्स शील्ड आणि मुलींसाठीच्या मनोरमा आपटे ट्रॉफी यांचा समावेश आहे. हॅरिस शील्ड जी 16 वर्षांखालील गटात खेळवली जाते. या स्पर्धेचे हे 130 वे वर्ष ठरणार आहे. त्याचबरोबर गाईल्स शील्ड ही 14 वर्षांखालील मुलांच्या गटासाठी खेळवली जाते. मनोरमा आपटे ट्रॉफी ही स्पर्धा 16 वर्षांखालील मुलींसाठी खेळवली जाते. या स्पर्धांमध्ये ज्या शाळांना सहभाग घ्यायचा आहे, त्यांनी आपले अर्ज 21 सप्टेंबरपर्यंत सायंकाळी सहा वाजेपर्यंत [email protected] या ई-मेल आयडीवर संपर्प साधावा.

Comments are closed.