मुंबई इंडियन्समध्ये पडली उभी फूट; रोहित-हार्दिक वाद पुन्हा चव्हाट्यावर? सोशल मीडियावर अफवांचा स

हार्दिक पांड्याने रोहित शर्मा सूर्यकुमार यादवला अनफॉलो केले: मुंबई इंडियन्सच्या तंबूत अंतर्गत वादाच्या चर्चांनी क्रिकेटविश्वात मोठी खळबळ उडवली आहे. सलग दोन सामन्यांतून बाहेर असलेला कर्णधार  हार्दिक पांड्या सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. संघात सर्व काही सुरळीत नसल्याच्या चर्चा रंगत असतानाच हार्दिकने इंस्टाग्रामवर मुंबई इंडियन्सला अनफॉलो केल्याची चर्चा सोशल मीडियावर जोर धरू लागली. आता तर आणखी एक नवा दावा समोर आला असून, हार्दिकने रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनाही अनफॉलो केल्याची चर्चा रंगली आहे.

हाफ एमआय, येतो रोहित-सूर्यालाही अनफॉलो?

या संपूर्ण प्रकरणाला तेव्हा अधिक हवा मिळाली, जेव्हा सोशल मीडियावर काही यूजर्सनी दावा केला की हार्दिक पांड्याने इंस्टाग्रामवरून मुंबई इंडियन्सला अनफॉलो केले होते. मात्र काही वेळानंतर त्याने पुन्हा मुंबई इंडियन्सला फॉलो केल्याचंही सांगितलं गेलं. काही काळ हार्दिकच्या फॉलोइंग लिस्टमध्ये मुंबई इंडियन्सचं नाव दिसत नसल्याचा दावा करण्यात आला होता.

मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूममध्ये मतभेद असल्याच्या अफवा आधीच जोरात असताना, या अनफॉलो प्रकरणामुळे चर्चांना आणखी उधाण आलं. सध्या हार्दिकच्या इंस्टाग्राम फॉलोइंग लिस्टमध्ये मुंबई इंडियन्सचं नाव पुन्हा दिसत आहे. तो सध्या 151 अकाउंट्स फॉलो करत असल्याची माहिती समोर आली आहे.

हार्दिकच्या फॉलोइंग लिस्टमध्ये रोहित-सूर्याचं नाव नाही

दरम्यान, आता आणखी एक मोठा दावा समोर आला आहे. हार्दिक पांड्याने इंस्टाग्रामवर रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांना फॉलो करणं बंद केल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे चाहत्यांनी या गोष्टीचा संबंध संघातील कथित मतभेदांशी जोडायला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे हार्दिकच्या सध्याच्या फॉलोइंग लिस्टमध्ये रोहित आणि सूर्यकुमार यांची नावं दिसत नसल्याचंही सांगितलं जात आहे.

IPL 2026 मध्ये मुंबई इंडियन्सची निराशाजनक कामगिरी

मुंबई इंडियन्स संघाच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर आयपीएल 2026 मध्ये मुंबई इंडियन्सचा प्रवास जवळपास संपुष्टात आला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूविरुद्ध 2 विकेट्सनी झालेल्या पराभवानंतर मुंबईचा प्लेऑफचा मार्ग पूर्णपणे बंद झाला. लीग स्टेजमध्ये अजून तीन सामने बाकी असले तरी संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

हे ही वाचा –

BCCI Fined RCB coach Andy Flower : RCBच्या विजयानंतरही मोठा धक्का! हेड कोच फ्लॉवरवर कारवाई, कारण ऐकून चाहत्यांनाही धक्का, नेमकं काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.