“हार्दिक आयपीएलपूर्वी नक्कीच फिट होईल”, RCB च्या माजी खेळाडूचा खोचक टोला!
बीसीसीआयने न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर केले. या दौऱ्यात ५-५ सामन्यांची टी२० आणि एकदिवसीय मालिका, दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या महत्त्वाच्या आणि मोठ्या दौऱ्याला भारताचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या अद्याप पूर्णपणे फिट नसल्याने मुकला आहे.
हार्दिक याआधीही दुखापतीमुळे भारताच्या अनेक महत्त्वाच्या सामन्यांना मुकला आहे. त्याच्या या अनुपस्थितीबाबत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या माजी खेळाडूने मिश्किलपणे विधान केले आहे.
माजी क्रिकेटपटू श्रीवत्स गोस्वामीने म्हटले की, हार्दिक दुखापतींचा पर्वा न करत आयपीएलआधी नक्कीच मैदानात येईल.
हार्दिक मे महिन्यात झालेल्या आयपीएल २०२६ पासून एकही स्पर्धात्मक सामना खेळलेला नाही. त्याचा भारतासाठी शेवटचा सामना टी२० विश्वचषक २०२६ मधील अंतिम सामना होता. तसेच तो भारत अ च्या ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या सामन्यांमधून मैदानावर परतणार होता, मात्र त्याला पुन्हा दुखापत झाली आणि त्याचे पुनरागमन लांबणीवर पडले. त्याला पोटरीची दुखापत झाली.
गोस्वामीने ‘बियॉंड२३’ या क्रिकेट पॉडकास्टवर हार्दिकच्या संभाव्य पुनरागमनाबाबत वक्तव्य केले. त्याने म्हटले, “हार्दिकच पुनरागमन अजून खूप दूर आहे. त्याला आधी CoE कडून प्रमाणपत्र मिळवावं लागेल आणि मग एक-दोन देशांतर्गत सामने खेळावे लागतील. थोडंफार देशांतर्गत क्रिकेट खेळल्याशिवाय कोणीही थेट भारतीय संघात येऊ शकत नाही.”
“तो 10 षटकं गोलंदाजी करू शकतो हे त्याला सिद्ध करावं लागेल आणि मगच तो पुनरागमन करू शकेल, त्यामुळे सध्या तरी तो खूप दूर आहे. तो न्यूझीलंड मालिका खेळणार नाही, पण आपल्या सर्वांना माहीत आहे की तो आयपीएलपूर्वी नक्कीच फिट होईल,” असेही गोस्वामीने म्हटले आहे.
हार्दिक त्याच्या दुखापतींबरोबर मुंबई इंडियन्सच्या संभाव्य ट्रेडबाबतही चर्चेत आहे. हार्दिक एमआयचे नेतृत्वपद सांभाळत असून संघ २०२६ च्या हंगामातील गुणतालिकेत नवव्या स्थानावर राहिला होता. यावरून त्याला खेळाडूबरोबर एक कर्णधार म्हणूनही संघर्ष करावा लागला. यामुळे आयपीएलचा नवा हंगाम सुरू होण्याआधी फ्रॅंचायझी त्याला ट्रेड करण्याची शक्यता आहे.
सध्यातरी फ्रॅंचायझीकडून हार्दिकच्या ट्रेडबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. तसेच हार्दिक कधी फिट होऊन मैदानात परतणार याची क्रिकेट रसिकांना प्रतीक्षा आहे. (Hardik Pandya will be definitely fit before the IPL Says Former RCB Player)
Comments are closed.