हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष, पटोलेंना डच्चू, निष्ठावान कार्यकर्त्याला संधी

हर्षवर्धन सपकल: काँग्रेसच्या (Congress) गोटातून अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. काँग्रेसच्या नवीन प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाला आहे. हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होण्याची शक्यता असल्याचे वृत्त एबीपी माझाने दिले होते. त्यानुसार आज त्यांची नियुक्ती झाल्याचे पत्र प्रसिद्ध झाले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना बदलाच्या चर्चा सुरु होत्या. अखेर आज नाना पटोले यांच्याकडील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पद हे हर्षवर्धन सपकाळ यांना गेले आहे. हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. तसेच गांधी परिवाराचे अत्यंत जवळचे सहकारी ते मानले जातात. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्य पदाच्या शर्यतीत अनेक नावे होती. यामध्ये कोल्हापूरचे सतेज पाटील, लातूरचे अमित देशमुख, सांगलीचे विश्वजित कदम यांची नावे देखील होती. मात्र, अखेर हर्षवर्धन सपकाळ यांच्याच गळ्या प्रदेशाध्यक्ष पदाची माळ पडली आहे. जाणून घेऊयात हर्षवर्धन सपकाळ यांची राजकीय कारकिर्द

हर्षवर्धन सपकाळ यांची कारकीर्द

हर्षवर्धन सपकाळ  (सर्वोदयी कार्यकर्ता)
जन्मः 31 ऑगष्ट 1968
जात – मानव
धर्म: मानवता
राष्ट्रीयत्व : भारतीय
शैक्षणिक पात्रता: बी.कॉम, बी.पी. एड.
व्यवसाय: चेट्टी, सामाजिक
निवास:”वर्षा” सपकाळ व्हॅली, निसर्ग नगर, जांभरुण, बुलढाणा.(महाराष्ट्र) 443001
संपर्क: 9422180485

कुटुंब:

शंभर मिरिनिनी (पत्नी)
डॉ. गार्गी (मुलगी), यशोवर्धन (पुत्र)

सामाजिक क्षेत्रातील योगदान :

1) गांधी तथा विनोबा यांच्या विचारधारेवर आधारीत ग्राम-स्वराज निर्माण
2) सर्वोदय विचारांवर आधारीत राष्ट्रनिर्माण युवक शिबिरे
3) ग्रामस्वच्छता अभियान तथा आदर्श ग्राम चळवळीत सक्रिय योगदान
4)जलसंधारण व जलव्यवस्थापन प्रकल्पांची अंमलबजावणी.
5)आदिवासी समुदायाचे तथा गावांचे सक्षमीकरण

राजकीय क्षेत्रातील योगदान:

१) विद्याली राष्ट्रीय अध्यक्ष – राजा रुजती फासिंग राज संघटना
2)  जेष्ठ पक्ष निरिक्षक – ओडिसा लोकसभा/विधानसभा 2024
)) राष्ट्रीय सचिव- ए.बी.सी. नवी दिल्ली– सह प्रभारी गुजरात- मध्यप्रदेश -पंजाब (दहा वर्ष)
)) राष्ट्रीय उपाध्यक्ष- राजीव गांधी पंचायत राज संघटना
5) माजी अध्यक्ष- जिल्हा परिषद बुलढाणा (1999 ते 2002)
6) माजी विधान सभा सदस्य- 22 बुलडाणा विधानसभा (2014 ते  2019)
7) माजी सदस्य- जिल्हा परिषद बुलढाणा (1997 से 2006)
8)
9) पक्ष निरिक्षक- अनेक राज्यांमध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने.
10)माजी  उपाध्यक्ष- महाराष्ट्र राज्य युवा कॉंग्रेस

अधिक पाहा..

Comments are closed.