देवेंद्र फडणवीसांनी लोकशाहीलाच फाशी दिली, सपकाळांचा हल्लाबोल, अधिवेनावरुन सरकारवर टीका
देवेंद्र फडणवीसांवर हर्षवर्धन सपकाळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकशाहीलाच फाशी दिली असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. हे अधिवेशन म्हणजे राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला असा टोला देखील सपकाळांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. ते नागपूरमध्ये बोलत होते.
राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला
सध्या नागपूरमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांना अधर्मी म्हणले पाहिजे तसेच निंदकाचे घर असावे शेजारी हा संदेश सुद्धा त्यांना मान्य नाही. देवेंद्र फडणवीस यांना मी जल्लाद म्हणलो होतो. देवेंद्र फडणवीस हे लोकशाहीलाच फाशी देत असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. राज्याचे हिवाळी अधिवेशन कसे झाले असा प्रश्न हर्षवर्धन सपकाळ यांना विचारले असता त्यांनी राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला अशा शब्दात त्यांनी अधिवेशनाचे वर्णन केले. बिबट्या सारखे विषय या ठिकाणी मांडले गेले आणि महाराष्ट्रचे प्रश्न बाजू गेल्याचे सपकाळ यांनी सांगितले.
आणखी वाचा
Comments are closed.