मोदी हे गझनी आहेत, अहिल्याबाई होळकरांनी उभारलेला मनकर्णिका घाट, मंदिरं बुलडोझरने पाडली: हर्षवर्

हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar) यांनी बांधलेला काशीतील मणिकर्णिका घाट (Manikarnika Ghat) बुलडोझर चालवून जमीनदोस्त करण्यात आला आहे. हे पाडकाम करताना अहिल्याबाईंचा पुतळा तोडला गेल्याचा आरोप झाल्याने संतापाची लाट उसळली आहे. यावरून पाडकामावरून मोदी सरकारवर टीकेची झोड उठली आहे. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी मोदी हे गझनी आहेत, असे म्हणत जोरदार हल्लाबोल केलाय.

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, अहिल्याबाई होळकर यांनी वारासणीत बांधलेल्या घाटावर मोदी बुलडोझर चालवतात.  मोदी हे गझनी आहेत, मनिकर्णिका घाट पाडत आहे, त्यांचा निषेध करतो. देवतांच्या मूर्ती पाडल्या गेल्यात. गझनीने जशी घाटावरील मंदिरे पाडली, तशीच मोदी पाडत आहेत, अशी टीका त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलीय. तर, काँग्रेस तीव्र आंदोलन छेडेल. वेळ पडली तर आम्ही देखील काशी येथे जाऊन आत्मक्लेश आंदोलन पुकारू, असा इशारा देखील हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलाय.

Manikarnika Ghat Varanasi demolition controversy: अहिल्याबाई होळकर यांचं देखील नाव पुसायचंय

विलासरावांचेच नाव नाही तर अहिल्याबाई होळकर यांचे देखील नाव पुसायचे आहे.  दुरुस्ती करत घाट बांधता आला असता.  हे महाराष्ट्राला आव्हान दिले गेले आहे. एकीकडे मुंबईबद्दल वक्तव्य करायचं आणि तिकडे अहिल्याबाई होळकर यांचे नाव पुसायचे. घाट उद्ध्वस्त करतात, तेव्हा यांचे बेगडीपण समोर आले आहे, अशी टीका देखील हर्षवर्धन सपकाळ यांनी केलीय.

एमआयएम आणि भाजपवर हर्षवर्धन सपकाळ: एमआयएम एक भाजप कॅन नॅचरल अलायन्स

महापालिका निवडणुकीमध्ये असदुद्दीन ओवैसींच्या एमआयएमचा मोठा करिश्मा पाहायला मिळाला. अनेक महाालिकांमध्ये एमआयएमने मुसंडी मारली. राज्यातील 29 पैकी 13 महापालिकांमध्ये एमआयएमने 125 जागा जिंकल्या आहेत. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केलाय. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, महाराष्ट्रात दोन जातीय वादी विचार आहेत. एमआयएम आणि भाजपचं अलायन्स आहेत. हे दोघे बाधित विचार आहेत.  आपण वेळीच सावध झालो नाही तर वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही.  ओवैसी आणि फडणवीस एकाच विचाराने पुढे जात आहेत. जिना आणि हिंदू महासभेचा देखील अलायन्स होता. या लोकांचे नॅचरल अलायन्स आहे, असे म्हणत त्यांनी असदुद्दीन ओवैसी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली आहे.

https://www.youtube.com/watch?v=5dKqqUqDZNs

आणखी वाचा

Chandrashekhar Bawankule: नवनीत राणांना पक्षातून निष्कासित करा, अमरावतीमधील पराभूत झालेल्या 22 उमेदवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, चंद्रशेखर बनकुळेंची प्रतिक्रिया, म्हणाले….

आणखी वाचा

Comments are closed.